वरुथिनी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वडमुखवाडी मधील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने वरुथिनी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल व माता रुख्मिणी यांची चंदन उटी मोठ्या भक्तिमय वातावरणात बल्लाळेश्वर वाघमारे, किरण दाते यांनी परिश्रमपूर्वक साकारली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांचे हस्ते सपत्नीक श्रींची चंदन उटी पूजा करण्यात आली. यावेळी कीर्तनकार सोमनाथ महाराज भालेराव, बल्लाळेश्वर वाघमारे, किरण दाते यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. फराळाचा प्रसाद नैवेद्य श्रीना वाढविण्यात आला.
परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींचे दर्शनास तसेच चंदन उटी पाहण्यास गर्दी केली. यावेळी पंचक्रोशीतील सेवेकरी, वारकरी , भाविक, भक्तगणांनी या सोहळ्यात सहभागी होऊन श्रीचे दर्शन घेतले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट व जीर्णोद्धार समिती तर्फे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात एकादशी निमित्त ह.भ.प. सोमनाथ महाराज भालेराव यांची सुश्राव्य किर्तन सेवा मोठ्या हृदयस्पर्शी वाणीतून झाली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी कीर्तन श्रवणास झाली होती. एकादशी निमित्त फराळ अन्नदान सेवा अन्नदाते उद्योजक सागर काळजे, शुभम काळजे यांचे वतीने उत्साहात झाली. पदाधिकारी, भजनी मंडळ, भाविक, भक्त, सेवकांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले.
यावेळी मनोहर भोसले, चंद्रकांत मोरे, ह. भ.प. रमेश महाराज घोंगडे, साहेबराव काशीद, हर्षद अरबट आदी मान्यवर उपस्थित होते.
.jpeg)

Post a Comment
0 Comments