आळंदीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची भक्तिमय उत्साहात सांगता
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता भक्तीमय उत्सहात धार्मिक कार्यक्रमांनी झाली. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव यांचा संगम साधत अलंकापुरीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
२० ते २६ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे या सप्ताहात आयोजन झाले. या सप्ताहात ३५० हून अधिक सेवेकरी सहभागी होऊन श्री गुरुचरीत्र पारायण केले. अखंड नाम, जप, यज्ञ यांच्या माध्यमातून आळंदी नगरी अध्यात्मिक रंगात भाविक रंगले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती आणि सेवेकऱ्यांचा समर्पित सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण स्वामीमय झाले होते. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात उद्योजक बालाजी माने, उमेश पाटील, राजू रहांगडाले, प्रदीप फुंदे, निळकंठ घोडके, उमेश खरात तसेच सर्व पुरुष व महिला साधक सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. संयोजन व शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण या सप्ताहात सेवकांनी घालून दिले. सप्ताहाच्या दरम्यान दररोज सकाळी गुरुचरीत्र पारायण, याग, आरती व मार्गदर्शन प्रहर सेवा पार पडले. शेवटच्या दिवशी सामूहिक महाप्रसादाचे आयोजन उत्साहात झाले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेतला.
या सप्ताहामुळे आळंदीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात नवीन ऊर्जा संचारली. श्रद्धाळू भक्तांनी आयोजक मंडळाचे आणि सर्व सेवेकऱ्यांचे विशेष आभार मानले. श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ !" च्या जयघोषात सप्ताहाची सांगता मंगलमय वातावरणात झाली.
.jpg)

Post a Comment
0 Comments