माऊली मंदिर, स्वामी महाराज मठासह गोरोबाकाका मंदिरात उटी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री'चे भव्य नृसिंव्ह अवतारातील वैभवी रूप सेवकांनी परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे वैभवी रूप पाहण्यास आळंदी मंदिरात भाविकांनी गर्दी केली. यासह देवस्थानने भाविकांसाठी सोशल मिडीयाचा वापर करून श्रींचे चंदन उटी रूपदर्शन उपलब्ध करून दिल्याने भाविकांतुन समाधान व्यक्त करण्यात आले.
आळंदीत नृसिव्ह जन्मोत्सवा निमित्त श्री नृसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा झाली. येथे सुधीर गांधी, सुरेश गांधी बंधू परिवाराचे वतीने परिश्रम पूर्वक श्रींची चंदन उटी साकारण्यात आली. श्री संत गोरोबा काका समाधी मंदिर या ठिकाणी लक्षवेधी चंदन उटी साकारण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.
आळंदीत विविध मंदिरांत चंदन उटी लेप लावण्यास चैत्रात सुरुवात होते. नृसिंव्ह जयंती निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर विविध लक्षवेधी वस्त्रालंकार वापरून चंदन उटी लावण्यात आली. चंदन उटी तील वैभवी रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट करीत श्रीचे रूप लक्षवेधी सजले.
व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे मंदिरात नृसिंव्ह जयंतीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले. नृसिंव्ह जयंती निमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत जन्मोत्सव उत्साहात करण्यात आली. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा झाली. यावेळी मंदिरात पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे पदाधिकारी उपस्थित होते.
परंपरेने मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती झाली. श्रीनृसिंव्ह जन्मोत्सवा निमित्त श्रीना वैभवी पोशाख करण्यात आला. जन्मोत्सव कीर्तन, आरती, महानैवेद्य, प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. चैत्र शुद्ध पाडव्यापासून मृग नक्षत्रा पर्यंत माऊलींच्या संजीवन समाधीस नियमित चंदन उटी लेप लावण्यात येतो. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नरसिंह जयंती निमित्त श्रींचे संजीवन समाधीस चंदन लेपात विविध विष्णू अवतार रूपातील पूजा बांधण्यात येते. यासाठी आळंदी देवस्थान, स्वकाम सेवा कार्यकारी मंडळ अध्यक्ष सुनील तापकीर , महिलाध्यक्षा अशा तापकीर आणि सेवक देखील या उपक्रमात सहभागी होऊन सेवा रुजू करतात. या निमित्त माऊली मंदिरात श्रीचे दर्शनास भाविकांची गर्दी झाली होती. श्रीनां धुपारती झाल्या नंतर मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर होतो. येथील श्री संत गोरोबा काका समाधी मंदिरात चंदन उटी साकारण्यात आली. यासाठी संत गोरोबा काकांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते, बल्लाळेश्वर वाघमारे आणि सहकारी यांनी वैभवी अवतार परिश्रम साकारला. विविध मंदिरांत भाविकांनी दर्शनास गर्दी केली.


Post a Comment
0 Comments