राष्ट्रीय डेंग्यू दिन - तपासा,स्वच्छ करा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रीय डेंग्यू दिन - तपासा,स्वच्छ करा आणि भांडी झाकून ठेवा या घोषवाक्याने जनजागृती करीत खेड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.
गप्पी मासे पाळा असा संदेश देण्यात आला. ताप आल्यास रक्ताची तपासणी करणे या साठी आरोग्य शिक्षण व जनजागृती उत्साहात झाली. खेड तालुक्यातील विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला. यात एस,टी स्टँड, आठवडी बाजार आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. या वेळी आरोग्य निरीक्षक भारती भूषण, दिपक शेलार, महेश दहिवळ यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, प्रतीक गवारी, दिपक भुसारी यांनी परिश्रम पूर्वक सर्वेक्षण केले.


.jpg)
Post a Comment
0 Comments