Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीतील एमआयटी कॉलेजचा इंडिया टुडे रँकिंगमध्ये राष्ट्रीयस्तर मानांकन

आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्सचा उजवा ठसा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील एमएईईआरच्या एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (MITACSC), आळंदी कॉलेजने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता व राष्ट्रीय ओळख सिद्ध केली आहे. इंडिया टुडे बेस्ट कॉलेज रँकिंग २०२५ मध्ये MITACSC ने विविध अभ्यासक्रमांसाठी उल्लेखनीय स्थान मिळवत मानांकनात उजवा ठसा उमटविला आहे. 

 या संस्थेची ही कामगिरी संस्थेच्या उत्कृष्ट नेतृत्व, समर्पित प्राध्यापक, मेधावी विद्यार्थी, आणि सहकार्य शील घटक यांच्या परिश्रमाचे फलित आहे. व्यवस्थापन, वाणिज्य, सायन्स आणि संगणकशास्त्र या क्षेत्रांमध्ये MITACSC भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.

इंडिया टुडे रँकिंग २०२५ मध्ये MITACSC ची कामगिरी:सामान्य रँकिंग (India Today Colleges Rankings) विविध प्रकारांत यश संपादन केले आहे. यात 

BBA (बॅचलर ऑफ  Business ऍडमिनिस्ट्रेशन ) : ८३ वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर

राज्य स्तरावर महाराष्ट्रात ८ वा क्रमांक तर पुण्यात ४ था क्रमांक मिळविला आहे. 

BCA ( बॅचलर  ऑफ  कॉम्पुटर  अँप्लिकेशन्स ) : २१ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, २ रा क्रमांक  महाराष्ट्रात तसेच २ रा क्रमांक पुणे जिल्हा स्तरावर मिळाला आहे. 

B.Com (Bachelor of Commerce) : १४२ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, १२ वा क्रमांक राज्यस्तरावर, पुण्यात ४ था क्रमांक मिळविला आहे. 

B.Sc. (Computer Science) : १५२ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, १३ वा क्रमांक महाराष्ट्रात,  ३ रा क्रमांक पुण्यात मिळविला आहे. 

श्रेष्ठ उदयोन्मुख महाविद्यालये (Best Emerging Colleges Category) : यात BBA  : ३३ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, ४ था क्रमांक महाराष्ट्रात, १ ला क्रमांक पुण्यात, 

BCA  : विभागात ३ रा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, राज्यात १ ला क्रमांक, पुण्यात  १ ला क्रमांक मिळाला आहे. 

B.Com  :  ३५ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, १ ला क्रमांक महाराष्ट्रात, १ ला क्रमांक पुणे स्तरावर प्राप्त झाला आहे. B.Sc. ( Computer Science  ) :  २५ वा क्रमांक अखिल भारतीय स्तरावर, २ रा क्रमांक राज्यात आणि पुण्यात १ ला क्रमांक प्राप्त झाला आहे. 

  ही रँकिंग MITACSC च्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. महाविद्यालय वैश्विक स्पर्धेस सज्ज अशा विद्यार्थ्यांचे घडवणूक हे आपले प्रमुख ध्येय समजते आणि त्यासाठी विविध कौशल्य विकास कार्यक्रम, उद्योगाशी सुसंगत शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबवत असते. 

Post a Comment

0 Comments