कुरुळीत नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की नवीन शाळे बाबत उत्सुकता, नवीन वर्ग, नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवीन पुस्तके शिक्षणाची आवड हे सर्व काही नवीन शैक्षणिक सत्र २०२५-२६ या मध्ये मुलांना अनुभवता आले. यावेळी पुणे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयास भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना कारेकर साहेबांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी सिंहावलोकन करून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे. यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करुन घेण्यात यावी व परीक्षेस बसवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शिक्षणाधिकारी यांच्या समवेत पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी झिंजुरडे मॅडम व पंचायत समितीच्या अधिकारी भांगे मॅडम याही विद्यालयास भेटीसाठी आले होते.याप्रसंगी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव सोनवणे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. विद्यालयाची यशोगाथा सांगितली शाळेच्या स्थापने पासून विद्यायाचा निकाल ९५% पेक्षा आजतागायत की झालेला नाही. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, सचिव देवराम सोनवणे, कार्याध्यक्ष गुलाब सोनवणे, सहसचिव मधुकर नाईक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुत्र संचलन बाळासाहेब मुळे व आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब थोरात यांनी मानले.

Post a Comment
0 Comments