Type Here to Get Search Results !

Alandi अलकाश्री फाउंडेशन तर्फे मातोश्री रमाई आंबेडकर निवासी शाळेस विशेष सहकार्य

शालेय निवासी मुलं - मुलींना स्कूल शुज वाटप उत्साहात 

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कुंजीरवाडी, थेऊर येथील मातोश्री रमाई आंबेडकर  माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना अलकाश्री फाउंडेशनच्या वतीने अनाथ मुले, मुली यांना शिक्षण देणे तसेच वयोवृद्ध बेघर अशा मुळा मुलींना मदत करणे, तळागाळातील निराधारा यांना मदत करणे, तसेच ज्या महिला बेघर व्यक्ती, महिला यांना आधार देणं. ग्रामीण भागात समाजातील सर्व सामान्य तळागाळातील अशा सर्वांना मदत करणे, विकलांग,अंध अशा बऱ्याच लोकांना जिथं आवश्यकता आहे. तिथं मदत पोहोचवणे अशा सर्व गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविणे हा हेतू अलकाश्री फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे. असे मत अलकाश्री फाउंडेशन प्रमुख दिपाली जाधव यांनी व्यक्त केले.          

    मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांनी सांगितले की, शाळा  विना अनुदानित असून अलकाश्री फाउंडेशनचे वतीने विद्यार्थ्यांना मुला - मुलीसाठी स्कूल शुजचे व लेगीनचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाल्याचे सांगितले, या प्रसंगी आश्रम शाळा मुख्याध्यापिका शबाना शेख, अमोल शिंदे, हनुमंत केदार, प्रवीण कांबळे, वासुदेव बारी, माधुरी सुपेकर, मीना खंडागळे आदी शिक्षक वृंद तसेच अलकाश्री फाउंडेशनचे पुजा हाणफोडे, लहु गाडेकर, आशुतोष वाकोदकर, माही शिंदे, पायल म्हस्के, कादर शेख, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सुहास सावंत, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले. प्रास्ताविक सुनिल तुपे यांनी केले. आभार अमोल भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments