शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालयाचे आळंदीत उद्घाटन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्राचे दूरदर्शी नेतृत्व व युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आळंदी शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने "शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालय" आळंदीतील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आळंदी नगरपरिषद व्यापारी संकुल क्रमांक २ जुन्या एस.टी. स्टँड समोर शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालयाचे आळंदीत उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तम गोगावले, आळंदी शहर शिवसेना प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन झाले.
तत्पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका पूजा अभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालय" या उपक्रमाचे उदघाटन सोहळा उत्साहात झाला. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी विरोधी पक्षनेते गटनेते डी डी भोसले पाटील, माजी नगरसेवक रमेश गोगावले, युवासेना आळंदी शहर प्रमुख मनोज पवार, उपशहर प्रमुख निखिल तापकीर, चारुदत्त रंधवे, शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख युवानेते आशिष गोगावले, शशिकांत राजे जाधव, अनिकेत डफळ, श्रीपाद सुर्वे यांच्यासह आळंदी शहरातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागेल तसेच नागरिकांना विविध दैनिके व मासिके एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने सोय झाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments