आळंदी : समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी राज्यातील पालखी महामार्गावरील रस्ते पालखी सोहळ्याचे दरम्यान बंद केले जातात. असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे वारकरी व भाविकांच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत. या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी केला आहे.
गेली शेकडो वर्षांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रस्त्यावरून पंढरपूर कडे जात असतात. ही पालखी सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या बाबत अबू आझमी म्हणाले, पालखी वेळी रस्ते बंद केले जातात. असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा वारकरी संप्रदायातून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या बाबतची महाराष्ट्रातील संत परंपरे बाबत त्यांनी माहिती करून घ्यावी. पालखीची शेकडो वर्षांची परंपरा अविरत चालू असून लाखो वारकर्यांच्या पंढरीच्या दिशेने जाती, धर्म भेद विसरून वारकरी एकत्र येतात. वारी हे मॅनेजमेंटचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी वारी बाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून ते सोहळ्याला गालबोट लावणारे आहे. त्यांनी पालखी बाबतचे वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा ट्रस्ट, भाविक व समस्त वारकरी संप्रदायाचे वतीने त्यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. वारकर्यांच्या भावना दुखावल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा भाविक, वारकर्यांचे वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्ट अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांनी इशारा दिला आहे.
Post a Comment
0 Comments