भक्ती गीते, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांनी रंगलेली गुरुपौर्णिमा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे आळंदी रस्त्यावरील साई मंदिरात गुरुपौर्णिमा विविध धार्मिक उपक्रमांनी हरिनाम गजरात साजरी झाली. विविध कार्यक्रमात भक्ती गीते, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांनी रंगलेली सायंकाळ, फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, लक्षवेधी रांगोळी आणि श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी लक्षवेधी होती.
गुरुच्या कार्याला वंदन करत गुरुवारी गुरु पौर्णिमा श्री साई मंदिरात उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने मंदिरात दर्शनास भाविकांची मोठी गर्दी होती. गुरुपौर्णिमेस पहाटे काकड आरती, सनई वादन, साई चरित्र ग्रंथ पारायण, रुद्र अभिषेक, व्यास पूजा तसेच श्रीची पूजा आणि मिरवणूक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ ही भाविक भक्तांनी यावेळी मोठ्या भक्तिमय उत्साहात घेतला. सबका मालिक एक है... श्रद्धा सबुरी.. की जय... साईनाम चे जयघोषाने साई मंदिर दुमदुमून गेले.
साई मंदिर परिसरात भाविक भक्तांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. पंचक्रोशीतील नागरिकांनी गुरुपौर्णिमे निमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम रंगले. श्रींचे दर्शनास दिवसभर मंदिर परिसरात सेवा सुरु होती. आपापल्या गुरूंना वंदन करून त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून अनेक कार्यक्रमांची परिसरात उत्साहात रात्री उशिरा सांगता झाली. श्री साई मंदिर देवस्थान मध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सेवा उत्साहात झाली.
श्री साई सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष नलगे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments