आळंदीत पुरेशा पाणी पुरवठ्यास उपाय योजना ; सार्वजनिक जागेवर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी पदी माधव खांडेकर रुजू झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध नागरी समस्यां, विकास कामे जाणून घेत कर्मचारी, विभाग प्रम्मुख, नागरिकांशी, पदाधिकारी, सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते यांचेशी सुसंवाद साधत उपाय योजना हाती घेतल्या. यातील उपाय योजनेस यश मिळाले असल्याचे सांगत ते म्हणले, येथील स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यात आले. यासाठी दिवस आणि रात्र पाळीत देखील स्वच्छतेचे कामास सुरुवात करण्यात आली.
एप्रिल, मे महिन्या पासून ४ घंटा गाड्या व ३ ट्रॅक्टर पासून ते जुलै २०२५ पर्यंत ८ घंटा गाड्या, ६ ट्रॅक्टर पर्यंत वाहने वाढविण्यात आली. येत्या २ दिवसात आणखीन २ घंटागाड्या वाढतील असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रथमच नियमित रात्रीचीही साफसफाई सुरू करण्यात आली. शहरात सद्या कचऱ्याचे ढीग रोजच्या रोज उचलले जात आहेत. घंटा गाड्यांवर यापूर्वी मदतनीस ( हेल्पर ) नव्हते. आता सर्व घंटागाड्यांवर हेल्पर देण्यात आले आहेत. बाह्य वळण रस्ता, नगरपरिषद हद्दीवर लगतच्या ग्रामपंचायतीचे हद्दीतील कचरा मोठ्या प्रमाणात बाहेरील रहिवासी लोक कचरा आणून फेकून जातात. याचा ताण आळंदीतील नगरपरिषद प्रशासन आरोग्य सेवेवर नियोजनावर येत आहे. या बाबतचा त्रास आळंदी मधील नागरिकांना होऊ नये म्हणून नगरपरिषद नियमित कचरा उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ३५ कामगार काम करीत होते. आता ६१ कामगार काम करीत आहेत. यासाठी कर्मचारी देखील वाढविले असून घंटागाडीस GPS navigation system कार्यान्वित करण्यात आली आहे. कामगारांचे उपस्थितीवर नियंत्रण मिळावे यासाठी बायोमेट्रिक यंत्र कार्यरत केले आहे. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या सर्व शाळांचे मुलांची गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहनपर आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन शालेय मुले यांना पारितोषिके देण्यात आली. १२ ते १५ वर्ष एकाच ठिकाणी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या चिठ्ठ्या टाकून करण्यात आल्या असून शिक्षक भरती प्रक्रिया शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे आणि धोरणानुसार शिक्षक भरती पारदर्शक केल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यातील अडथळे ठरलेले विद्युत पोलचे अडथळे दूर करण्यात आले आहे. यामुळे देहू फाटा चौकातील रहदारी सुरळीत झाली आहे. येत्या काळात उर्वरित रहदारीत अडथळे विद्युत पोल हटविण्यात येतील.
आळंदी नगरपरिषदेस जेसीबी खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. यासाठी होणारा वार्षिक जेसीबी मशीन वापराचा वार्षिक खर्च २५ ते ३० लाख रुपये होता. तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ दिवसात नगरपरिषदेचे स्वताचे जेसीबी मशीन वाहन ताफ्यात समाविष्ठ होईल. नवीन जेसीबी मशीन तेवढ्याच किमतीत होत असून खरेदी प्रक्रिया करण्यात आली आहे. नगरपरिषदेत रुजू झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिताचे कामकाज केले आहे.
आळंदी कचरा कुंडी मुक्त शहर जाहीर केले असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास ५०० रुपये दंड केला जाणार आहे. आणि स्वच सुंदर हरित बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सिंगल युज प्लास्टिक वर बंदी आहे. नागरिकांनी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीतील नागरिक आणि माऊली मंदिरात देवदर्शनास येणारा भाविक, वारकरी केंद्रबिंदू मानून नागरी सेवा सुविधानां प्राधान्य देणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments