श्रींचे समाधीवर तुळशीपत्र अर्पण करीत पुष्पवृष्टी ; मुख्य संयोजक नंदकिशोर एकबोटे
मुख्य संयोजक नंदकिशोर एकबोटे, आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर, पूर्व सैनिक सुभेदार गणेश दामोदरे, सुभेदार बबन चौगले, हवालदार दत्ता पोतदार, हवालदार सुरेश पाटील, हवालदार धनेश्वर भोस, पूर्व सैनिक उत्तम जाधव, पूर्व सैनिक नायक संदिप इंदलकर, शंकर नाना चंदिले महाराज, दशरथ महाराज चवरे, निवृत्ती महाराज ताठे शास्त्री, नवल महाराज, श्रीहरी महाराज रेड्डी, ह.भ.प. रवींद्र जोशी महाराज, ओकांर ताठे महाराज, मच्छिंद्र धिरडेकर, रोहिदास कदम, हनुमंत तापकीर, यांचेसह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विद्यामंदिर शिवाजीनगर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले असे माजी सैनिक (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे सुभेदार डॉ. नंदकुमार एकबोटे, सैनिक ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख उत्तम जाधव व त्यांचे सहकारी विशेष उपस्थितीत होती.
यावेळी डॉ. नंदकुमार एकबोटे म्हणाले, भारतीय सैनिकांसाठी व सर्व भारतीयांसाठी हा महत्वपूर्ण विजय दिवस असून याचा सर्व देशप्रेमी भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. म्हणून २६ जुलै याच दिवशी आपण गेली १३ वर्षे आळंदीत माऊलींच्या समाधी वर पुष्प वृष्टी करुन सैनिकांना नेहमी विजयश्री मिळावी, सैनिकांचे आरोग्य चांगले रहावे, सैनिकांचे दहा दिशातून रक्षण व्हावे अशी आर्त प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सैनिकवरील आपले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले पाहिजे तसेच देशप्रेमासाठी प्रत्येकाला वेड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या / देशाच्या रक्षणार्थ आपले सर्वस्व समर्पित केले त्या शहीद जवानांचे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशीच स्मरण न करता रोजच स्मरण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असून त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे असे सांगितले. तसेच कारगिल विजय दिवसाची गौरवगाथा सांगून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उमटवले. नायक संदीप इंदलकर कारगिल युद्धात सहभागी झाले होते. त्यानंतर मिलिटरी ड्यूटीत दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले आहे. कैवल्य सामाज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सैनिकां साठी आरोग्य, दीर्घायुष्य व त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करून शहिदांना आदरांजली हरिनाम गजरात अर्पण करण्यात आली. यावेळी मंदिरातील सप्ताहात नाना महाराज चंदिले यांची हरिनाम गजरात कीर्तन सेवा झाली. तात्पुरवे शहीद जिवांचे प्रतिमेची पूजा करण्यात आली. आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत गेल्या १३ वर्षा पासून येथे कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. यावेळी सैनिकांसाठी रक्षाबंधन दिनी राखी पौर्णिमा साजरी करता यावी यासाठी शाळांतून संकलित करण्यात आलेल्या राख्या सैनिकांसाठी पाठविण्यास सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी आळंदी देवस्थानने या निमित्त विशेष सहकार्य केले. संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेस परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments