समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना शनिवार ( दि. २६ ) रोजी दुपारी एक वाजता सन्मान
यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी या देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांना देखील धार्मिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल धार्मिक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुरवंशी,सारिका निंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजन नाथसाहेब ( धार्मिक भूषण ), श्रीनिवास जोशी (संगीत ), सविता मालपेकर (कलाभूषण ), आनंद अग्रवाल ( पत्रकारिता ), संजय चितळे ( व्यापार ), निलेश भिंताडे ( उद्योग ) यांना भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना शनिवार ( दि. २६ ) रोजी दुपारी एक वाजता सन्मानपत्र, सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी राज्यमंत्री मेधा कुलकर्णी उपस्थित रहाणार आहेत. उत्सवाचे उदघाटन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते २२ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजन नाथसाहेब ( धार्मिक भूषण ) यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments