Type Here to Get Search Results !

pune - varale सी.आय.ई. वराळे कंपनीत कामगारांना तब्बल १५ हजार ८६६ रुपये एवढी भरघोस वेतनवाढ

सी.आय.ई. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड गिअर्स डिव्हिजन कामगार संघटनेत करार यशस्वी





महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन अहिर प्रमुख भूमिका 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सी.आय.ई. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड गिअर्स डिव्हिजन वराळे चाकण आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्यात चौथा वेतन करार यशस्वी झाला. यात कामगारांना १५ हजार ८६६ रुपये एवढी भरघोस पगार वाढ आणि विविध सेवा सवलती असलेला करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी, कामगार संघटना यांच्यात प्रदीर्घ वाटाघाटी आणि अखेर खेळीमेळीचे वातावरणात अडचणीचे काळातही मोठी पगारवाढ आणि सेवा सवलती सर्व कामगारांसाठी देण्यात आल्या आहेत. या कराराचे कामगार, संघात प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी करारावर स्वाक्षऱ्या करीत जल्लोषात कराराचे स्वागत करीत करार स्वीकारला.

   या प्रसंगी वारले येथील कंपनीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार, कामगार नेते सचिन भाऊ अहिर, उपाध्यक्ष सुनील भाऊ अहिर, विजुभाऊ काळोखे, प्रदेश सचिव ईश्वरजी वाघ, युनिट अध्यक्ष  राहुल पाटील, युनिट उपाध्यक्ष राकेश नलावडे, युनिट जनरल सेक्रेटरी उमेश ठाकरे, युनिट खजिनदार संदीप तिटवेकर, युनिट सचिव कपिल दाभाडे, सदस्य तुकाराम पाटील, सदस्य संदीप बोदडे, कंपनी कडून कंपनीचे ED&CEO मनोज मेनन, HR & IR india Head विनायक कडस्कर, HR Head रवी वैद्य, COO वैभव पहारीया, Plant Head जतीन साहु, HR manager अभिषेक मजली यांचेसह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

   यावेळी कामगारांनी उत्पादन वाढीसह वेतनवाढ देणारा कामगार  आणि कंपनीचे हिताचा करार केला. करार झाल्याने कामगारांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गेल्या सहा महिन्याने पासून या करारासाठी वाटाघाटी सुरु होत्या. तब्बल २५ बैठका या करारासाठी घेण्यात आल्या. हा करार अत्यंत चांगल्या समंजस्यपणे आणि खेळीमेळीचे उत्साहाने आनंदात झाला. यावेळी कंपनीचे कामगारांनी डीजेच्या तालावर कामगारनेते आमदार सचिन भाऊ अहिर यांची थार गाडीतून भव्य मिरवणूक काढली. कंपनीच्या द्वारावर फटाक्यांच्या आतिषबाजी आणि डीजेच्या दणदणाटात सचिन भाऊ यांचे स्वागत केले. सर्व कामगार यावेळी डीजेच्या तालावर, गुलाल उधळत, मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतावर नाचले. कामगारांनी करारा बद्दल आनंद व्यक्त करीत उत्साहात करारावर मान्यवरांनी स्वाक्षऱ्या केल्या. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे वराळे युनिट पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांनी करारासाठी विशेष परिश्रम घेतले.  

Post a Comment

0 Comments