Type Here to Get Search Results !

Alandi अलंकापुरीत काळभैरवनाथ महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

निखिल प्रसादे यांचे वेदमंत्र जयघोषात    

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरात श्रींचे मूर्तीची वज्रलेप देत प्रथा परंपरांचे पालन करीत वेदमंत्र जयघोषात प्राणप्रतिष्ठापना विविध उपक्रमांचे आयोजन करीत धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या आनंदी, मंगल भक्तिमय वातावरणात उत्साहात करण्यात आली. 

  श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरात या निमित्त लक्षवेधी पुष्प सजावट सजली होती. श्रींचे दर्शनास भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी करून दर्शन घेतले. प्राणप्रतिष्ठापना महोत्सवा निमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजला होता. मंदिरात वेदमंत्र जयघोषात शांतीयुक्त पठन, महाभिषेक, उत्तरांग हवन, श्रींचे मूर्तीची  प्राणप्रतिष्ठापना, बलिदान, कलशारोहन, महानैवेद्य, महाआरती, पूर्णाप्रतिष्ठापना, महाप्रसादाचे मुक्तद्वार वाटप आळंदी देवस्थान तर्फे झाले. 

     येथील श्री ग्रामदेवता काळभैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्रावण महिन्याचे पहिल्या सोमवारी ( दि. २८ ) सर्व देवदेवतांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. या निमित्त भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यात सर्व देवदेवतांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरून हरिनाम जयघोषात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. यावेळी झेंडे, तुळशी कलश डोक्यावर घेत लक्षवेधी मिरवणूक झाली. यासाठी भाविक, नागरिकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. भव्य मिरवणूक, नगारखाना फटाक्यांची आतिषबाजी, ढोल, ताशाचा दणदणाट, घंटा ठणठणाट, वारकरी विद्यार्थी हरिनाम गजर, अब्दागिरी, भगवे पताका ध्वज, टाळ, वीणा, मृदंग त्रिनादात श्रींचे मूर्तीची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. यावेळी नगारखानासह फटाक्यांची आतिषबाजी, ढोल, ताशाचा दणदणाट, घंटा नादेचा ठणठणाट, वारकरी विद्यार्थी यांचा हरिनाम गजर उत्साहात झाला.

  लोकार्पण सोहळ्यात मंगळवारी ( दि. २९ ) प्रायश्चित संकल्प गणपती पुण्याह वाचन पंचांग कर्म मंडप प्रवेश सर्व मंडळांची स्थापना अरणी मंथन, नवग्रह हवन, जलधिवास कुटीर हवन महाआरती झाली. बुधवारी ( दि. ३० ) शांतीयुक्त पठण, हवन स्नपन विधी, धान्य अधिवास, श्यधिवास, दीपोत्सव, महानैवेध्य आणि महाआरती झाली. गुरुवार ( दि. ३१ ) शांतीयुक्त पठण, महाभिषेख, उत्तरांग हवन, श्रींचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, बलिदान कलशारोहन, महानैवेध्य, माहाआरती, पुरणाहुती प्राणप्रतिष्ठापना त्या नंतर श्रींची महाआरतीझाली. महाप्रसादाने धार्मिक मंगलमय उत्साही वातावरणात हरिनाम गजरात श्रींचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळा हरिनाम गजरात झाला. यावेळी नागरिक, भाविकांनी या सोहळ्यास दर्शनास गर्दी केली. यावेळी मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव यांचा आळंदी ग्रामस्थांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

    श्री काळभैरवनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त होम हवन वेदमंत्र जयघोषात करण्यात आले. यावेळी सपत्नीक शालिनी शंकरराव कुऱ्हाडे पाटील, विद्या राजेंद्र उगले, अभिलाषा संकेत वाघमारे यांच्या हस्ते होमहवन पूजा बांधण्यात आली. यावेळी वेदमूर्ती निखिल प्रसादे आणि सहकारी ब्रम्हवृंद यांनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य केले. श्रींचे मूर्तीला वज्रलेप करण्यात आला आहे. यावेळी शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते श्रींचे मूर्तीची वेदमंत्र जयघोषात प्राणप्रतिष्ठापना करण्यात  आली. माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, आळंदी देवस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे पाटील, रामचंद्रकाका  कुऱ्हाडे पाटील, अभियंता  योगेंद्र कुऱ्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील, प्रियेश रानवडे, भैय्या वाघमारे, सुनील रानवडे, ज्ञानेश्वर श्रीधर वाघमारे, अनिल वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, विष्णू वाघमारे, संगीता वाघमारे, कुंदा वाघमारे, सुरेश  वाघमारे, सोमनाथ वाघमारे, स्वप्निल वाघमारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या वतीने महाप्रसाद सेवा रुजू करण्यात आली. यावेळी चार दिवशीय होमहवन पूजा, ब्राह्मण भोजन, साहित्य, श्रींचा महानैवेद्य सेवा ग्रामविकास अधिकारी मयूर उगले यांच्या वतीने रुजू झाली. वेदमूर्ती निखिल मुरलीधर प्रसादे गुरुजी, वेदमूर्ती वैभव श्रीराम मांडे गुरुजी संभाजीनगर, लौकिक साजगुरे गुरुजी नासिक, रघुराज कुलकर्णी गुरुजी पुणे आदी ब्रह्मवृंद यांनी उत्सवाचे पौरोहित्य केले. 

 या प्रसंगी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांचे हस्ते मान्यवरांचे सत्कार झाले. या प्रसंगी  आळंदी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आदित्य घुंडरे पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, महेश कुऱ्हाडे, सागर रानवडे, अक्षय घुंडरे, अमित घुंडरे, प्रसाद बोराटे, संतोष भोसले, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थांनी उत्सवाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. लोकार्पण सोहळ्यास आळंदीकर ग्रामस्थ यांनी सोहळा यशस्वी होण्यास विशेष परिश्रम घेतले. महाआरती व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली.  


Post a Comment

0 Comments