Type Here to Get Search Results !

Alandi कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती माऊली मंदिर सुवर्ण कलश दर्शन

हरिनाम गजरात भव्य दिव्य मिरवणूक लक्षवेधी  


                                        आळंदीत सुवर्ण कलश मिरवणूक हरिनाम गजरात 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदीत सुवर्ण कलश मिरवणूक हरिनाम गजरात सुरु, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा दणदणाट सवाद्य मिरवणूक हरिनाम गजरात कार्नाय्त आली. पारंपरिक वेशभूषा महिलांची तसेच वारकरी भाविक, नागरिकांचे उपस्थितीत लक्षवेधी मिरवणूक झाली. प्रदक्षिणा मार्गावर लक्षवेधी विद्युत रोषणाईने आळंदीतील रस्ते उजळले. नित्य नैमित्तिक होणारी गुरुवारची श्रींची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. ज्ञानोबा - तुकाराम हरिनाम गजरात श्रींचे मंदिर सुवर्ण कलशाची मिरवणूक झाली. श्रींचे वैभवी रथात सुवर्ण कलश ठेवत लक्षवेधी हरिनाम गजरात मिरवणूक झाली. यावेळी महिला, पुरुष, भाविक, शालेय वारकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिव प्रताप ढोल ताशा पथक घंटा नादाचे ठणठणाटात, फटाक्यांची लक्षवेधी आतिषबाजी भाविकांचे लक्षवेधी ठरली. विविध अभंग गीतांचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सुरसंगम बॅण्डबाजा ने मिरवणुकीत रंगत आणली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त, आळंदीकर ग्रामस्थ, पदाधिकारी, वारकरी भाविक, महिला, पुरुष, शालेय विध्यार्थी, वारकरी साधक आणि सवाद्य वाजविणारे उत्साही युवक, तरुण, युवती मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले. माऊली मंदिरापासून मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गे आजोळघरा समोरून मंदिरात आली. दरम्यान आजोळघरा समोर श्रींचे सुवर्ण कलशाचे स्वागत आवेकर भावे रामचंद्र संस्थांन चे वतीने लक्ष्मण मेदनकर यांनी श्रीफळ पुष्पहार अर्पण करण्यास आळंदी देवस्थान कडे सुपूर्द केला. यावेळी आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर , पंडित दौडकर आदी उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थ सर्व माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, देवस्थानचे पदाधिकारी श्रींचे रथात विराजमान होते. यात माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, देवस्थानचे मानकरी योगेश आरू, योगीराज कुऱ्हाडे पाटील, अनिल कुऱ्हाडे पाटील, संतोष मोझे सरकार, मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर आदी सहभागी होते. निलेश महाराज लोंढे, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक  यांनी सुवर्ण कलशाचे उपक्रमास विशेष परिश्रम घेतले.   

  आळंदी सुवर्ण कलश मिरवणुकी दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी, दिघी पोलीस वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी मिरवणुकी दरम्यान सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले. यात पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांची प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी सर्वाना मिरवणुकी दरम्यान सुसंवाद ठेवत मिरवणूक उशिरा सुरु झाल्याने कमी वेळेत पूर्ण करण्यास परिश्रम घ्यावे लागले. यासाठी आळंदी आणि दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीत बाळासाहेब भोसले यांचा लक्षवेधी नगार खान त्या मागे सवाद्य पथके, महिला डोईवर तुलशी वृंदावन घेऊन मिरवणुकीत सहभागी होते.  

  उद्या शुक्रवारी ( दि. १५ ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सुवर्ण कलश पूजन करून कलशारोहन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.  श्रीकृष्ण जन्मोत्सव दिनी माऊली जन्मोत्सव असून प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांची प्रवचन सेवा, समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा होणार आहे.      


Post a Comment

0 Comments