Type Here to Get Search Results !

Alandi गणेशोत्सवात महिला भजनी मंडळांची भजन सेवा हरिनाम गजरात रुजू

महिला भजन सेवा कार्याचे आळंदी पंचक्रोशीत कौतुक 



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गणेशोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांत महिला वारकरी भजन सेवा मंडळांची भजन सेवा हरिनाम गजरात होत आहे. आळंदी पंचक्रोशीत राधाकृष्ण महिला भजनी मंडळाची भजन सेवा रुजू होत आहे. या महिला भजनी मंडळाचे विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहे. पंचक्रोशीतून या महिला मंडळाच्या जनसेवेच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. 

  राधाकृष्ण भजनी मंडळ भोसरी हे गेल्या बारा वर्षा पासून भजन सेवारात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचन्हे माध्यमातून महिलांनी भजन सेवा रुजू केली आहे. यात श्रीक्षेत्र देहू - आळंदी, चऱ्होली खुर्द, बुद्रुक, मरकळ, चिखली, पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी हरिनाम गजरात भजन सेवा देत आहेत. भजनी मंडळाचे विशेष म्हणजे महिलांचे संघटन आणि धार्मिक कार्य सेवाभावी वृत्तीने केले जात आहे. महिलांना एकत्रित करीत महिलांच्या माध्यमातून नामस्मरण, हरिनाम गजरात घडवून आणले जात आहे. श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत तुकोबारायांचे भक्तीचा प्रचार, प्रसार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. मंडळाचे अध्यक्षा राधाताई नरोटे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भजनी मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा सन्मान झाल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष नंदाताई पठारे यांना उत्कृष्ट भजन, गायन भजनी मंडळाला आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाते. अतिशय सुंदर भजन सेवा त्यांचे माध्यमातून होत असल्याने परिसरात विविध ठिकाणी मंडळाचे कौतुक होत आहे. 

  आमदार महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने  भरवण्यात आलेल्या भजन स्पर्धा, भोसरी इंद्रायणी थडी अशांमध्ये देखील सहभाग घेत मंडळाने सन्मानचिन्हे, प्रमाणपत्र मिळाले आहेत. मंडळातील सदस्य गायन करतात. श्री संत ज्ञानोबाराय - श्री संत तुकोबारायांची पायी वारीत भजनी मंडळ सेवारत असते. महिना वारी आणि भजन सेवा या मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे. वारकरी सांप्रदायिक वसा पुढे नेण्याचे कार्य मंडळ करीत असल्याचे अध्यक्षा राधाताई नरोटे यांनी सांगितले. 

  यासाठी राधाकृष्ण महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा राधाताई नरोटे, उपाध्यक्ष नंदा पठारे, गुंफा तावरे,  ज्योत्स्ना काटे, विमल ढवळे, रेश्मा काळे, यशोदा काटे, सरस्वती काटे, कमल काटे, पुष्पा जाधव आदीनी या  वारकरी भजनी मंडळाच्या माध्यमातून गायन, भजन सेवा रुजू करण्यास विशेष परिश्रम घेत आहेत. 

माजी सैनिक रामदास पठारे आळंदी काटे वस्ती या ठिकाणी हरिनाम गजरात राधाकृष्ण भजनी मंडळाचा कार्यक्रम धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाला. राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचे वतीने चऱ्होली बुद्रुक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील हरिनाम गजरात सेवा रुजू करण्यात आली. महिला भजनी मंडळाचे कार्यास भजनसेवे दरम्यान मरकळ माजी चेअरमन शंकरराव वर्पे यांनी शुभेच्छा देत सेवेचे कौतुक केले. 

Post a Comment

0 Comments