Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी नगरपरिषद शास्ती माफीसाठी अभय योजना जाहीर

 मालमत्ता करावरील शास्ती माफीस अर्ज करण्याचे आवाहन 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना नगरपरिषदे कडून मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. 

    या अभय योजने अंतर्गत थकबाकी मालमत्ता कर भरल्यास संबंधित शास्ती माफ करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकी तात्काळ भरावी यासाठी आवाहन केले आहे. १९ मे २०२५ पर्यंत च्या थकीत मालमत्ता कराच्या रक्कमे वरील शास्तीस अभय योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद कर संकलन विभागात कार्यालयीन वेळेत २० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज केल्यास अभय योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले आहे.   

Post a Comment

0 Comments