Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत राजे ग्रुप मंडळाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लक्षवेधी

माऊलींच्या जीवन चरित्रावर आधारित हलता देखावा


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील राजे ग्रुप मंडळाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लक्षवेधी देखावा मंडळाने आपल्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने सादर केला आहे. सदर देखावा भव्य आणि हलता असून देखावा पाहण्यास नागरिकांची भाविकांची तसेच गणेश भक्तांची गर्दी होत आहे. 

  संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन चरित्रावर आधारित हलता देखावा माऊलींचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त सादर करण्यात आला आहे. सर्वांच्या भक्ती भावाला समर्पित आहे. माऊलींच्या चरित्रातील भक्तिमय क्षण अनुभवण्यासाठी सर्वाना मंडळाने आवाहन केले आहे. देखाव्याचे उदघाटन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीरबुवा यांचे हस्ते झाले. यावेळी व्यवस्थापक माउली वीर, अप्पासाहेब पगडे, विधी तज्ञ नाजीम शेख, राजे ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाविक, नागरिक उपस्थित होते. स्टेट बँक समोर मरकळ रस्ता येथे राजे ग्रुप आळंदी यांनी भेट देण्यास भाविकांना आवाहन केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक कार्य मंडळ करीत आहे. यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य होत असल्याचे अप्पा पगडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments