Type Here to Get Search Results !

Pune पुणे जिल्ह्यात पाणंद, शिवरस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

महसूल सप्ताहात उपक्रमास जिल्ह्याधिकारी यांचे सूचना ; तात्काळ कार्यवाही ने ग्रामस्थ समाधानी  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : 'महसूल सप्ताह २०२५'च्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन दुतर्फा वृक्षारोपण लावण्यास उद्दिष्ट निश्चित करुन त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्देश दिले आहेत.  

  जुन्नर तालुक्यात टिकेकर वाडी, नारायणगाव, शिरोळी, उदापूर, आर्वी, पिंपळगाव, आंबेगाव तालुक्यात लौकी येथे पाणंद रस्त्याच्या तसेच मावळ तालुक्यात इंदुरी सांगुडी येथे शिव रस्त्याच्या तसेच नवलाख उंबरे, मंडळ वडगाव, गहुंजे ते सांगवडे, थोराण येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

   मुळशी तालुक्यातील चाले, नेरे, दत्तवाडी, भुगाव, आंग्रेवाडी, भुकूम, कुळे, खुबवली, मारूंजी ९ गावामध्ये तसेच घोटावडे गावठाण ते बंधाऱ्याकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या अंदाजे दीड कि.मी.दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.

   अप्पर तहसील पिंपरी चिंचवड.अंतर्गत निरगुडी व विठ्ठलनगर, देहू येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा तसेच अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत अष्टापूर ते पिंपरी-सांडस शिवस्त्याच्या दुतर्फा  वृक्षारोपण केले आहे.

   हवेली तालुक्यात खेडशिवापुर येथील श्रीरामनगर गाव ते गाऊडदरा या दोन गावांना जोडणाऱ्या शिव रस्त्याची दुतर्फा वृक्षारोपण लागवड करण्यात आली. भोर तालुक्यात भोंगवली येथे वृक्षारोपण आणि बंद असलेले १०० हून अधिक रस्ते वाहतूकी साठी पुन्हा सुरू करण्यात आले. वेल्हा ( राजगड ) येथील अडवली, कानंद, ओसांडे, बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये पानंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. खेड येथील चाकण महसूल मंडळातील गोणवडी ते बोरदरा शिवरस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

  पुरंदर तालुक्यातील मौजे आडाचीवाडी येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या सहमतीने पानंद रस्ता मोकळा करून लोकसहभागातून मुरूमीकरणाचे काम सुरू करण्यात आले.दौंड तालुक्यात एकूण १६ तसेच शिरूर तालुक्यात १० गावांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली. या मोहिमेत गावातील ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, दरम्यान रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रशासना तर्फे सत्कार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments