Type Here to Get Search Results !

Alandi - dighi दिघी पोलीस स्टेशन तर्फे श्रींचे जल्लोषात विसर्जन

पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया पोलिस मित्रांचा सन्मान


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांच्या हस्ते पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन ऑफ़ इंडिया ला सन २०२४ / २०२५ विविध प्रसंगी पोलिस मित्रांचे माध्यमातून बंदोबस्ताच्या अंनुषगाने पोलिस मित्र सेवा रुजू केली. या निमित्त पोलिस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ़ इंडिया व्हॉईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे सह पोलिस मित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार दिघी पोलीस स्टेशन तर्फे श्रींचे जल्लोषात विसर्जन झाल्या नंतर करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया नामजयघोषात तसेच जल्लोषात श्रींचे मूर्तीचे विसर्जन शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदी येथील विसर्जन कुंडात करण्यात आला. 

     पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया पोलिस मित्रांचा सन्मान प्रसंगी व्हाईस चेअरमन ( इंडिया  ) रवींद्र जाधव, सचिव वैभव दहिफळे, मीडिया मयूर गिल, गणेश यश, प्रवीण गिरी, विकास गिरमे, आशिष दिलीप कुलकर्णी, गोरख पोपट गायकवाड, संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस मित्र वेल्फेअर  फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे सह पोलिस मित्रांचा सन्मानपत्र देऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांचे हस्ते सत्कार करून प्रेरणादायी उपक्रम दिघी पोलिस स्टेशन मध्ये गणेशोत्सवा दरम्यान  राबविण्यात आला. व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांचे कार्याचे कौतुक करीत सन्मान करण्यात आला. आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी जाधव यांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. आळंदी परिसरातून कार्याचे कौतुक होत आहे. दिघी पोलीस स्टेशन तर्फे श्रींचे मूर्तीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. दिघी पोलीस स्टेशन ते आळंदी इंद्रायणी नदी घाट लगत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला, दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पुरुष - महिला कर्मचारी, नागरिक, पोलीस मित्र उपस्थित होते. दिघी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांचे नियंत्रणात दिघी पोलीस स्टेशन मध्ये गणेशोत्सव प्रथा परंपरांचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.     

Post a Comment

0 Comments