Type Here to Get Search Results !

Alandi मराठा संघर्ष योद्धा जाणता राजा मनोज जरांगे पाटील यांचेसाठी प्रार्थना पूजा

मराठा आरक्षण शासन निर्णयाचे आळंदीत स्वागत 


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :  मराठा आरक्षणा राज्य शासनाने घेतलेल्या शासन निर्णयाचे आळंदी स्वागत करीत राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाचे मागणी आंदोलनात हुतात्मा झालेल्या मराठा सेवक बांधवाना आर्थिक मदत देऊन शासनाने हुतात्मा झालेल्या मराठा समाजातील कुटुंबिय यांना प्रत्येक कुटुंब निहाय १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि या साठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे देखील स्वागत करून सकल मराठा समाज आळंदी व पंचक्रोशीचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच मराठा संघर्ष योद्धा जाणता राजा  मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आरोग्य स्वास्थ्य मिळावे, त्यांना दीर्घायुष्य मिळावे, त्यांचे आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी. यासाठी आळंदी माऊली मंदिरात रविवारी ( दि. ७ ) माऊली मंदिरात श्रींचे चल पादुका पूजा, अभिषेक करण्यात आला. तसेच पुढील शासन निर्णय लवकर व्हावेत, या साठी होणाऱ्या आंदोलनास अधिक बळ मिळावे. या साठी माउलींना प्रार्थना आणि साकडे घालण्यात आले. या साठी श्रींची पूजा करण्यात आली. या प्रसंगी संयोजक अर्जुन मेदनकर, उदय काळे, रोहिदास कदम, बाबासाहेब भंडारे, गोविंद ठाकूर तौर, शिवाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी मंदिरात श्रींचे पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती प्रफुल्ल प्रसादे गुरुजी यांनी केले.  

Post a Comment

0 Comments