Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

रक्तदान शिबीरास रक्दात्यांचा उत्साही प्रतिसाद  




आळंदी ( माऊली घुंडरे ) : आळंदी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सेवा पंधरवडा शिबिरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. उपसंचालक डॉ भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ग्रामीण रुग्णालय मध्ये आयोजित तिसऱ्या आरोग्य शिबीरास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३३७ स्त्रिया आणि ३५८ पुरुष अशा ६९५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यात आयोजित शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.  

  या शिबिरा साठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेत शिबीर यशस्वी केले. ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. जमलेल्या लाभार्थ्यांना वाढत्या हृदय विकारांवर  तसेच वाढत्या हार्ट अ‍ॅटॅक प्रमाणावर कशी मात करायची, हृदयाची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त अभियान अंतर्गत रक्तदान शिबीर व अवयवदान शपथ घेण्यात आली. २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी अवयवदान शपथ देखील उत्साहात घेण्यात आली. 

  येथील आळंदी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरातील २६ दात्यांनी रक्तदान केले. या साठी रक्तदानास प्रतिसाद दिलेल्या रक्तदात्यांचा सन्मानपत्र सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर, आळंदी शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे ताई., नियती फाउंडेशन अध्यक्षा नियती शिंदे यांचे हस्ते सन्मानपत्र वाटप करीत शिबिराचे उदघाटन दीप प्रज्वलन, फीत कापून करण्यात आले. आळंदी ग्रामीण रुग्णालयात सेवा पंधरवडा सुरु असून नागरीकांनी या सेवा पंधरवडा निमित्त आपल्या आरोग्याची काळजी घेत विविध आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले आहे. 

  यावेळी रक्तदान शिबिराचे   प्रसंगी नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा नियतीताई शिंदे यांचा सेवा कार्यास विशेष सहकार्य निमित्त सत्कार करण्यात आला. आळंदी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण, व त्यांचे नाते वाईक यांना रुग्णालयात आल्या नंतर बसण्याची अडचण आणि निकड लक्षात घेऊन आळंदी ग्रामीण रुग्णालयास ३० खुर्च्या महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. विलासतात्या बालवाडकर महाराज यांनी भेट दिल्या. सामाजिक बांधिलकीतून सेवा रुजू केल्या बद्दल महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष विलासतात्या बालवाडकर महाराज यांच्या सेवा कार्याचे कौतुक करीत त्यांचे आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments