सिध्दबेटात वृक्षारोपण स्वच्छता उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सिद्धबेट परिसरामध्ये अजिंक्य वन महोत्सव अभियाना अंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.
अजिंक्य डी वाय पाटील समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर, अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फारूक सय्यद, आळंदी जनहित फाउंडेशन कार्यध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ,उंबर, बेल, कडुलिंब अशा विविध स्वरूपाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या श्रमसंस्कार शिबिरास महाविद्यालयातील डॉ एस एम खैरनार, डॉ पल्लवी खरात, डॉ निलेश माळी, डॉ भाग्यश्री ढाकुलकर, डॉ कांचन वैद्य, डॉ जगन्नाथ गावंडे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्राध्यापक रियाज काझी, रजिस्ट्रार श्री गोरखनाथ देशमुख, डॉ नागेश शेळके, डॉ प्रमोद वडते, अर्जुन मेदनकर, योगेश महाराज वाघ, कैवल्य टोपे, रोहिदास कदम, पितांबर लोहार आदींचे विशेष सहकार्य लाभले. वृक्षारोपण उपक्रम यशस्वीते साठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दिलीप बाळासाहेब घुले व सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
वृक्षारोपण करताना आपल्या भागात वाढणारी, सावली देणारी, पक्ष्यांना घरटी बांधता यावीत, अन्नपाणी मिळावे, अशीच म्हणजे भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याची गरज आहे असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर यांनी केले.पर्यावरण समतोल व संवर्धनासाठी केलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले.



Post a Comment
0 Comments