Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीतील झोपडीधारकांना घरकुल देण्यास प्राधान्य देण्याची मागणी

मुख्याधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यास साकडे 


   झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे नेते भगवान वैराट यांचा संवाद     

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील झोपडपट्टी धारक, पथविक्रेता, तृतीयपंथी यांच्या विविध महत्त्वपूर्ण विषया संदर्भात संघर्ष नायक भगवानराव वैराट यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर  यांची भेट घेऊन आळंदीतील झोपडीधारकांना घरकुल देण्यास प्राधान्य देण्यासह या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ जिल्हा प्रशासनाचे माध्यमातून शासनाकडे पाठविण्यासाठी आग्रही मागणी करीत विविध प्रश्नाचे संदर्भात शिष्ठ मंडळाने चर्चा करीत संवाद साधला.  

    महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी शिष्टमंडळासह आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची भेट घेऊन आळंदी शहरातील झोपडपट्टी धारक, पथविक्रेता, तृतीयपंथी यांच्या विविध समस्यां, नागरी सेवा सुविधांच्या प्रश्ना संदर्भात चर्चा करून निवेदन दिले. यावेळी काळेवाडी झोपडपट्टी, झाडी बाजार, भाजी मंडई, आळंदी शहरातील पथ विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली, काळेवाडी झोपडपट्टीचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे, झाडी बाजार येथील पथविक्रेत्यांवर कार्तिकी यात्रेत त्रास न देता त्यांना हटवू नये त्यांच्या वर वाढीव कर आकारणी करून अन्याय करू नये, भाजी मंडई येथे पोलीस स्टेशन ते खंडोबा मंदिर रोडवर बेकायदेशीर बसून व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, भाजी मंडईतील चौपालचे मागील बाजूस विद्युत पथ दिवे बसविणे, शहरातील पात्र असणाऱ्या पथ विक्रेत्यांवर कार्तिकी यात्रेत अन्याय कारक कारवाई करू नये, २०२४ मध्ये पथविक्रेता समिती निवडणूक घेण्यात आली सर्व समिती सदस्यांना विचारात घेऊनच शहरातील अतिक्रमण कारवाई नियोजन करावे, सदस्यांचे नगरपरिषदे मध्ये फलक बसविणे, समिती सदस्य आणि पथविक्रेत्यांना तात्काळ ओळखपत्र, परवाने वाटप करणे, तृतीय पंथीयांच्या समस्यां विविध सवलत योजना अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना लोकनेते भगवानराव वैराट यांचे हस्ते देण्यात आले.  यावेळी मुख्याधिकारी खांडेकर यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक उत्तर देत संवाद साधला. या अनुषंगाने शासन निर्णय आणि कायदेशीर मार्गाचा वापर करून सेवा सुविधा घरकुल आदी प्रश्न मार्गी लावले जातील. यासाठी शासनांकडे पत्रव्यवहार करून संवाद साधला जाईल असे सांगितले. मागण्या संदर्भात प्राधान्य क्रमाने पाठपुरावा करून विविध मागण्याची पूर्तता केली जाईल असे सांगितले.        यावेळी शिष्टमंडळात राज्य संघटक सुरेखा भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, पुणे जिल्हा कार्याध्यक्षा निलम सोनवणे, काळेवाडी झोपडपट्टी अध्यक्ष सदाशिव कांबळे, अर्जुन मेदनकर, उमेश बिडकर, सचिन काळे, बाळू जाधव, गजानन मिटकरी, एकनाथ मोरे, भानुदास मदने, मंगल कोळी, पूजा उडापे, शंकर गुंजाळ, शुभम वेळकर, विनोद कांबळे, सुरेश आहेरकर, धनराज सकट, तुषार नेटके, अरुण वावरे, प्रज्ञा पाटील, योगिता घनमोठे, आरोही पवार, उषा सातपुते, आदेश सोनवणे, शामराव सोनवणे, संपत दोरके, तुकाराम बोडरे, राहुल बाजड, पदाधिकारी,  कार्यकर्ते महिला आघाडी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments