मरकळ ग्रामस्थ - आळंदी चऱ्होली डॉक्टर्स देवदूत मदतीस आले धावून
या किराणा रेशनिंग किट मध्ये सम्राट आटा पाच किलो, तांदूळ स्टीम पाच किलो, लूज बेसन एक किलो, साधी तूरडाळ एक किलो, साखर एक किलो, तेल खुशबू एक लिटर एक पॅकेट, पोहे एक किलो, विक्रम दहा वाला एक युनिट, पार्ले पाच एक पॅकेट, मिरची पावडर अंबारी दोन एक युनिट, कांदा मसाला २०० ग्रॅम एक पॅकेट, कोलगेट पन्नास ग्राम पेस्ट एक पॅकेट, साबण एक युनिट, रीन साबण पाच युनिट
असे १४ वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्यात आले. यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. या पुढील काळात देखील मदत देण्यात येणार असून या संदर्भात नियोजन सुरु असल्याचे डॉ. विकास पाटील, डॉ. संजय व्यवहारे, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ, आळंदी चऱ्होली पंचक्रोशी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सेक्रेटरी डॉ. विकास पाटील, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन यांनी पुढाकार घेऊन सर्व डॉक्टर्स मित्र यांनी २ लाख १० हजार रुपयांचा निधी जमा करीत किराना किट वाटपास निधी संकलन सहकार्य केले.
मरकळ ग्रामस्थांच्या वतीने सर्व सामान्य परिवारांमधून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत करण्यात आली. प्रत्येक्ष बाधित शेतकरी, नागरिक यांना पोच करण्यासाठी मरकळ ग्रामस्थ सचिन लोखंडे, भानुदास चव्हाण, श्रीकांत वर्पे, तुषार पाचपुते, डॉ. विवेक पाटील, आदित्य लोखंडे, सुजित लोखंडे यांनी परिश्रम पूर्वक पोच केली. या साठी स्थानिक नागरिक आणि शिवसेना ( उबाठा गट ) तालुका प्रमुख दिपक मुळे यांनी सुनियोजित नियोजन केल्याने अगदी कमी वेळेत पाच गावांत मदतीचे वाटप अगदी शेतकरी यांचे घराजवळ, शेताचे बांधावर जाणे शक्य झाल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.
या वेळी संवाद साधताना ग्रामस्थ म्हणाले येथील संकटाचे काळात ११ महिन्यांचे बाळ आणि ३ वर्षाचा एक मुलगा यांना घेऊन येथील ज्येष्ठ नागरिक यांनी रात्री दिड ते दोनचे सुमार पासून चिंचेचे झाडावर सांभाळून धरत स्वतः सह दोन लहान बालकांचे प्राण वाचविले. साबळे वाडी किट वाटप रात्री उशिरा आणि सेवकांनी पावसात मदत वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी येथील पदाधिकारी ग्रामस्थ ॲड विनायक नाईकवाडी, बाळासाहेब गुळवे, शिवसेनेचे ( उबाठा ) तालुका अध्यक्ष दिपक मुळे, प्रल्हाद अडगळे, भगवान बांगर यांनी मदत वाटपास मार्गदर्शन करीत योग्य ठिकाणी मदत कशी पोहोचेल यासाठी परिश्रम घेतले. साबळे वाडी नंतर वालवड येथे मदतीचे वाटप करण्यात आले. येथील भूम सरपंच बालाजी शिर्के यांनी देखील पूरग्रस्त बाधितांना मदत मिळण्यासाठी वाटपाचे नियोजन केले.
लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ, आळंदी चऱ्होली पंचक्रोशी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सेक्रेटरी डॉ. विकास पाटील, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन यांनी पुढाकार घेऊन सर्व डॉक्टर्स मित्र यांनी २ लाख १० हजार रुपयांचा निधी जमा करीत किराना किट वाटपास सहकार्य केले. आळंदी चऱ्होली पंचक्रोशी डॉक्टर्स असोसिएशन आणि लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन, मरकळ ग्रामस्थ यांचे वतीने मोठी मदत परिसरात वाटप करण्यात आली.
अतिवृष्टीच्या पावसाने नद्याना महापुर आला. यात नद्यांचे परिसरातील गावांत अचानक आलेल्या या महापुराची पाण्याने बंधारे फुटून अधिक मोठी भर पडली. यावेळी अचानक पाण्याचे प्रवाहात वाढ होऊन धाराशिव सह मराठवाडा, आणि सोलापूर आदी परिसरात ढगफुटी होऊन शेतकरी, नागरिक यांची हानी झाली. यात जनावरे मोठ्या प्रमाणात दगावली.यावर मत करण्यासाठी बळीराजाला साथ देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून एक हात मदतीचा उपक्रम आळंदी चऱ्होली पंचक्रोशी डॉक्टर्स असोसिएशन आणि लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन, मरकळ ग्रामस्थ यांचे वतीने राबविण्यात आला. या साठी विशेष सहकार्य मरकळ ग्रामस्थ यांनी मदतीचे संकलन करून मदत पोच केली.
महापुराची पाण्यात धाराशिव भूम परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. या हाणींत जीवित आणि वित्त हानीचा समावेश आहे. हि हानी कधीही भरून येणारी नाही. या संकटात बाधित झालेल्या शेतकरी आणि बाधित नागरिक ज्यांचे घरांची मोठी पडझड झाली. अनेकांचे संस्कार उघड्यावर आहे. अनेकांची जनावरे डोळ्या देखत तडफडून गेली. महापुराची पाण्यात अनेकांचे गोठे होत्याचे नव्हते झाले. शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, बैल यांची हानी झाली. शेताची प्रचंड नुकसान झाले. शेतात माती देखील राहिली नाही. केवळ दगड गोटे वर राहिले. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, लहान पूल वाहून गेले. परिसरातील रहदारीला देखील रस्ते राहिले नाहीत. वाहने दूरवर लावून मदत पायी पोच करावी लागली. परिसर पाऊस होत असताना देखील मरकळ ग्रामस्थांनी आणि सामाजिक बांधिलकीतून आळंदी चऱ्होली पंचक्रोशीतील देवदूत डॉक्टर्स यांनी आपली वैद्यकीय सेवाटून वेळ काढून मदतीस धावून आले. भूम परिसराती श्री परदेशी या युवक शेतकर्याची शेती पूर्णपणे वाहून गेली. यावरील पत्राशेड, गोठा घर देखील राहिले नसल्याने खूप हळहळ व्यक्त झाली. बाधित शेतकरी यांना धीर देत मदतीचे वाटप करीत सेवाभावी व्यक्ती, संस्थानी मदतीस पुढे येण्याचे आवाहन डॉ. विवेक पाटील यांनी केले आहे.

.jpeg)




Post a Comment
0 Comments