पुणे ग्रँड चॅलेंज टूर - २०२६ ; पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर - २०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत असून २० जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला टप्पा टि. सी.एल सर्कल हिंजवडी फेज - ३ येथून सुरु होणार असून ती पुढे टी.सी.एस सर्कल - मेगा पोलीस सर्कल सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून- बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जावून परत डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) - डावीकडे वळून आढले बुद्रुक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भुमकर चौक-अंडरपास मार्गे-डांगे चौक-अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टि जंक्शन डावी कडे वळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
Post a Comment
0 Comments