Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत नर्मदा जयंती दिनी इंद्रायणी घाटावर आरती

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी यांचे वतीने नर्मदा जयंती, रथ सप्तमी निमित्त नर्मदा आरती तसेच इंद्रायणी माता, नर्मदा माता नामजयघोष, वारकरी सांप्रदायिक भजन सेवा, पंचपदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन प्रथा परंपरांचे पालन करीत इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती साजरी करण्यात आलीं. 

 या वेळी दिनकर तांबे यांचे हस्ते नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन करण्यात आले. या प्रसंगी रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे, अशोक महाराज सालपे यांचे सह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी, भाविक उपस्थित होते. 

  या वेळी हरिनाम जय घोष उत्साहात करण्यात आला. गेल्या  तीन वर्षां पासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती, रथ सप्तमी साजरी करण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. नर्मदा माता प्रचारक दिलीप महाराज ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रींचे आरतीला भाविकांनी गर्दी केली. 

Post a Comment

0 Comments