पुण्यात रविवारी रक्तदान सोहळ्याचे आयोजन ; आरएमडी फाउंडेशनचा उपक्रम
पुणे ( अर्जुन मेदनकर ) : रक्तदान आणि वृक्ष पुनरोपण ही जीवन संवर्धनाची दुहेरी बांधिलकी असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या आरएमडी फाउंडेशनने गेले चार दशके सेवाभावी परंपरा जोपसत समाजातील प्रत्येक घटका पर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा दृढ संकल्प केला आहे. याच संकल्पाचा भाग म्हणून १ मार्च रोजी पुण्यात रक्तदान सोहळ्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती आर. एम. डी. फाउंडेशनचे वतीने शोभाताई धारीवाल यांनी दिली.
आर. एम. डी. फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकीतून विकास आणि संवेदनशीलता यांचा समतोल राखत विविध विधायक उपक्रम राबविले जात आहेत. स्पर्धेच्या युगातील बदलत्या काळाचा, गरजांचा विचार करून फाउंडेशन ने वृक्ष पुनर्रोपण उपक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेत पर्यावरण संवर्धनाचे कार्य प्रभावी पणे राबविले आहे. या मध्ये पुणे बाह्यवळण मार्गाचे विकास कामातील अडथळे ठरणारे शेकडो वृक्ष जे तोडणार होते, ते न कापता पुनर्रोपण करण्यात आर. एम. डी. फाउंडेशनने विशेष भूमिका निभावली आहे. या वृक्षांचे पर्यायी जागेत स्थलांतर करून पुनर्रोपण करण्याची संकल्पना आर. एम. डी. फाउंडेशन अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन यांची असून त्यांच्या विशेष प्रयत्न आणि पुढाकारातून ट्री पुनर्रोपण प्रकल्प यशस्वी पणे राबविला जात आहे. या उपक्रमात सुमारे २ हजार ५०० वर वृक्ष यशस्वी पुनर्रोपण झाले आहे. देशात वातावरणीय बदल होत असताना हा उपक्रम इतरांना ही प्रेरणादायी आहे. हा उपक्रम संख्यात्मक मर्यादित नसून पर्यावरणीय दायित्व आणि शाश्वत विकास करण्यासाठीची ठाम भूमिका अधोरेखित करीत आहे.
१ मार्च ( रविवारी ) रोजी रसिकलाल धारिवाल यांचे जन्म दिना निमित्त रक्तदान सोहळ्याचे पुण्यात विविध केंद्रावर आयोजन करण्यात आले आहे. यात पुण्यातील विविध रक्तदान केंद्रावर सुमारे २४ हजार रक्त बॅग संकलन करण्याचा संकल्प करून विक्रम करण्याचा निर्धार केला आहे. यातून मानव सेवेची परंपरा उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीतून पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. या रक्तदान सोहळ्यात जास्तीत जास्त पुणेकर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक ३ येथील आर. एम. डी. बंगला येथे रक्तदान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान आणि वृक्ष संवर्धन या दोन्ही माध्यमातून जीवन वाचविण्याची आणि व विषयासाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याची ही दुहेरी चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आर एम डी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments