नारी शक्ती ग्रुप तर्फे उत्साहात आयोजन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : नारी शक्ती ग्रुप च्या वतीने स्व. भिवाजी सहाणे सभागृह इंद्रायणी नगर मध्ये जागतिक महिला दिनाचे निमित्त समाजाचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल पंचक्रोशीतील कर्तृत्वान महिलांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन सत्कार उत्साहात करण्यात आला.
या प्रसंगी भोसरी पोलीस स्टेशन मधील दिपाली सुरकुले, दामिनी पथक भोसरी पोलीस मयुरी शिंगाडे, नारी शक्ती ग्रुप अध्यक्षा दिपाली सुरवसे आदींनी मार्गदर्शन करीत महिलांना प्रबोधन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे
भोसरी पोलीस स्टेशन मधील कार्यरत माहिती पोलीस कर्मचारी, अधिकारी दिपाली सुरकुले, कविता गायकवाड, मयुरी शिंगाडे, ज्योती पवळे, नगरसेवक इंद्रायणी नगर भोसरी तुषार सहाणे, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या जागतिक महिला दिनी सन्मानित सत्कारमूर्ती मध्ये शिवानी वेदपाठक, पुष्पा सुपे, अनघा दीक्षित, आळंदी नगरपरिषद मुख्याध्यापिका प्रशालेच्या संध्या नाईकरे, नरसमा अलगिरी, त्रिशाळा बचुटे, गीतांजली भस्मे,
शिल्पा कात्रे, प्रणाली राऊत, निकिता कुंभारे, तृप्ती अमृतकर आदींना सन्मानित करण्यात आले. तन्वी मुसळे यांनी गणेश वंदना सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.
नारी शक्ती ग्रुप अध्यक्षा दिपाली सुरवसे यांनी महिला दिनाचे निमित्त आयोजित उपक्रमाचे परिश्रम पूर्वक आयोजन केले. सूत्र संचालन अलका जोगदंड यांनी केले. प्रास्ताविक तृप्ती मुसळे यांनी केले. कविता नांगरे यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments