Type Here to Get Search Results !

Alandi संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट तर्फे ॲड. उमाप यांचा सत्कार

                                    मंदिर कलशा रोहणास ॲड. तापकीर यांचे तर्फे सुवर्णदान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात मंदिर ट्रस्ट तर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान क्मेटी पालखी सोहळा प्रमुख पदी ॲड. राजेंद्र उमाप यांची निवड पालखी सोहळा प्रमुख पदी झाल्या बद्दल त्यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

  या वेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी आपले आई - वडील चऱ्होली गावचे माजी सरपंच दिवंगत भिकोबा शंकर तापकीर, व दिवंगत भीमाबाई भिकोबा तापकीर यांचे स्मरणार्थ गुढी पाडव्याचे मुहूर्तावर सुवर्ण कलाशास दोन तोळे सुवर्ण दान रक्कमेचा धनादेश थोरल्या पादुका  कलशा रोहणासाठी ३ लाख २५ हजार रुपये धनादेश ( दोन तोळे सुवर्णदान ) पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांचा सत्कार करून धनादेश ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. 

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात भव्य कलशारोहण सोहळा आयोजित होणार आहे. या उपक्रमास कलशा रोहणासाठी सुमारे ३० तोळे ( ३०० ग्रॅम ) सोन्याची आवश्यकता आहे.  या पवित्र सुवर्ण कार्याच्या पूर्ततेसाठी भाविकांनी सढळ हस्ते स्वर्णदान अथवा रोख देणगी स्वरूपात देऊन आपला सेवा रूपी वाटा अर्पण करून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. तापकीर, खजिनदार गायकवाड यांनी केले आहे. या वेळी चंद्रकांत मोरे, साहेबराव काशीद, किरण बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments