दिव्यांग बांधवांचे सेवक पाखरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा
येथील भांबुर्डेकर सराफ यांच्या दालनात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांना अभिवादन, श्री गणरायाला वंदन करीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, संकष्टी चतुर्थी आणि पत्रकार एम.डी. पाखरे यांचा वाढदिवस असा त्रिवेणी संगमाचा योग साधत दिवसभर पाखरे यांच्या वर प्रेम असणाऱ्या सन्माननीय व्यक्तीं कडून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल, दूरध्वनी आदी सोशल मीडियाचे माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला. या वेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे, अनिल जोगदंड, माऊली घुंडरे पाटील, दिनेश कुऱ्हाडे, संभाजी गोरडे, विनायक महामुनी, आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन शिंदे,सुयश कदम, वारकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळ सेवक कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण यांचा हि सत्कार करण्यात आला.
येथील कुणाल भांबुर्डेकर सराफ यांच्या दालनात वाढदिवस केक कापण्यापूर्वी राज्याचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून, गणेशाला वंदन करून तसेच शिवरायांना अभिवादन करून अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी निखिल व कुणाल भांबुर्डेकर त्यांचे सर्व सहकारी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी शहर काँग्रेस आय कमिटीचे नंदकुमार वडगावकर, प्रभारी अध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, एन. के. टी. ट्रस्ट जय भगवान चे विश्वस्त मनोहर दिवाणे , गिरीश जानवेकर, प्रसाद बोराटे आदी उपस्थित होते. या वेळी विविध मान्यवर यांनी मनोगतातून पाखरे यांच्या कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments