श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वा भव्य जन्मोत्सव सोहळा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेशी संवाद
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने होणाऱ्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदी अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या सप्ताहाचे आयोजनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त विधीतज्ञ माधवी निगडे यांचे समवेत बैठक झाली.
यावेळी देवस्थान तर्फे सविस्तर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. विश्वस्तांनी भेटीत अखंड हरिनाम सप्ताहाचे बाबत सविस्तर चर्चा केली.
आळंदीतील श्री भैरवनाथ ग्राम देवता ट्रस्टचे प्रशस्त प्रांगणात हा भव्य सोहळा ३ ते १० मे २०२५ या कालावधीत हरिनाम गजरात होणार आहे. या उत्सवात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मुख्यामंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आदी मान्यवर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यास श्रीक्षेत्र आळंदीत लाखो वारकरी आणि भाविक उपिस्थत राहणार आहे. यासाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. हा उत्सवी सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments