आळंदी ( अनिराज मेदनकर ) : केळगाव येथील भारतीय खेळ प्राधिकरण अंतर्गत जोग महाराज व्यायामशाळेस केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी जोग स्पोर्टस अकॅडेमी ला भेट देऊन महिला कुस्ती खेळाडूंशी सुसंवाद साधला. यावेळी व्यायाम शाळेच्या प्रगती संदर्भात कौतुक करीत व्यायाम शाळेच्या अडचणी संदर्भात चौकशी करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी खेड तालुका कुस्ती संघ अध्यक्ष पै. बाळासाहेब चौधरी, उपसरपंच किरण मुंगसे, दिलीप मुंगसे, पांडुरंग मुंगसे, विठ्ठल भांडवलकर, सुधीर वहिले, शिवाजी मुंगसे, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया अध्यक्ष रवींद्र जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अंकिता काटे, कुमार महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आदर्श गुंड, हार्दिक गुंड, विशाल गुंड,विशाल थोरावे, अजित गाडे, अक्षय गावडे,आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा सत्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकिता काटे, अंकिता गुंड यांचे हस्ते झाला. सुरेखा माने व मीनाक्षी आमझरे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment
0 Comments