आळंदीत ३ ते १० मे या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह
पारायणासह सोहळ्यात सहभागी व्हावे :- योगी निरंजन नाथसाहेब
आळंदीत सुसंवाद बैठकीत प्रमुख विश्वस्तांचे आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त श्रीक्षेत्र आळंदीत ३ ते १० मे २०२५ या कालावधीत भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यातील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात वारकरी, भाविक, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी केले आहे.
आळंदी येथील संस्थानचे भक्त निवासात ग्रंथालयात आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थ यांची सोहळ्याचे उत्सवातील नियोजन, आढावा या अनुषंगाने सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संवाद साधताना प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब बोलत होते.
या प्रसंगी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त व विद्यमान विश्वस्त विधीतज्ज्ञ राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील, बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील, विलास घुंडरे पाटील, सागर भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, रमेश गोगावले, प्रकाश कुऱ्हाडे, निलेश महाराज लोंढे, बाळासाहेब महाराज शेवाळे, अनिकेत कुऱ्हाडे, संतोष भोसले, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, शंकरराव कुऱ्हाडे पाटील, पांडुरंग वरखडे, अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, अजित वडगांवकर, विष्णू वाघमारे, महेश कुऱ्हाडे, राहुल चव्हाण, किरण येळवंडे यांचे आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. सोहळ्याचे नियोजना संदर्भात आळंदी ग्रामस्थांशी देस्थान ने संवाद साधला. दरम्यान बैठक सुरु असताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सद्दीच्छा भेट दिली. यावेळी देवस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आले.
ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे. यात मोठ्या संख्येने भाविक, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी अखंड हरिनाम सप्ताहा तील विविध कार्यक्रम सांगितले. सोहळ्यातील काळात उत्तम व्यवस्था व्हावी, संवाद राहावा यासाठी १२ समित्या गठीत करण्यात येणार आहे. यासाठी सेवाभावी व्यक्तींनी आपली नावे देण्याचे आवाहन केले आहे. सोहळ्यात भाविक, वारकरी नागरिक यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेत उत्तम व्यवस्था होणार आहे. उन्हाळा लक्षात घेऊन भव्य दिव्य मंडप व्यवस्था आणि उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कुलिंग यंत्रणा देखील भव्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त, पदाधिकारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रत भाविकांना देवस्थान प्रसाद भेट देणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले. उत्सव काळात नागरी सेवा सुविधा प्रभावी देण्यासाठी सर्व नियोजन सुरु असून कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. यात पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छ्ता, इंद्रायणी नदीत वरील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. देवस्थान सप्ताह काळात भोजन आणि निवास व्यवस्था मोफत केली जाणार आहे.
सोहळ्यात ६ ते १० वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० वाजता कीर्तन, दुपारी दिड वाजता चरित्र चिंतन, यात ३ ते ५ मे कालावधीत संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन, ६ ते ८ मे या कालावधीत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोतसवी वर्षा निमित्त ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन, ९ मे दिनी संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त नामदेव महाराज चरित्र चिंतन कथा होणार आहे. या शिवाय सोहळ्यात ३ ते १० मे या कालावधीत दुपारी हरिपाठ नंतर प्रवचन सेवा, सायंकाळी साडे सहा वाजता कीर्तन सेवा सुरु होईल. १० मे दिनी सोहळ्याची काल्याचे कीर्तन होईल. सोहळ्यात पहिला आणि शेवटच्या दिवशी आळंदी ग्रामस्थानी अन्नदान प्रसाद व्यवस्था स्वीकारली असून इतर दिवशी उत्सवातील नियोजनात भव्य अन्नदान प्रसाद वाटप होणार आहे.



Post a Comment
0 Comments