Type Here to Get Search Results !

शशिकांत जाधव यांना व्हिडिओ निर्मिती पुरस्कार प्रदान

 


अभिनंदनाचा वर्षाव 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा खास शिक्षकां मार्फत दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती साठी २०२३ -२४ स्पर्धेत इयत्ता ९ वी ते १० वी गटात इंग्रजी विषयाचे उत्तम व्हिडिओ निर्मितीसाठी उत्साहात झाल्या. 

   यात आळंदीतील प्रा. डॉ. न. का. घारपुरे प्रशालेचे आदर्श शिक्षक शशिकांत जाधव यांना तालुका स्तरावर व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या पुरस्कारात सन्मानचिन्ह ट्राफी, प्रमाणपत्र तसेच रोख २ हजार रुपये पारितोषिक बक्षीस उत्साहात प्रदान करण्यात आले.

   या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक अमोल बांगर, देवेंद्र बेळगे, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक भगवान वाणी, ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, तसेच मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे. आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांचेसह विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.  

Post a Comment

0 Comments