आळंदीत माजी नगरसेविका घुंडरे पाटील यांचा सत्कार
महिलांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा आळंदीत सन्मान
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यात एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष उपक्रमात शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यातील अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत सेवारत महिलांचा सन्मान उत्साहात करण्यात आला. यात आळंदी नगरपरिषद महिला बाल कल्याण समिती सभापती माजी नगरसेविका मालनताई घुंडरे पाटील यांचा विशेष सत्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात अध्यात्मिक, सेवाभावी महिला संस्था प्रमुखांचा उत्साहात सत्कार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या तर्फे हळदी कुंकू उपक्रम आणि वारकरी शिक्षण संस्थांना भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या.
या विशेष उल्लेखनीय सन्मान सोहळ्यास शिवसेना उपनेत्या प्रवत्या संजनाताई घाडी, उपनेत्या सुलभाताई उबाळे, महिला जिल्हा प्रमुख मनीषा परांडे, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले, माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस, सचिव कमलेश तांडेल, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे, शिवसेना आध्यत्मिक सेना सहअध्यक्ष प्रभंजन महतोले, सचिव श्रीराम माळी, आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, उपशहर प्रमुख माऊली घुंडरे, आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अखिल वारकरी गुरकुल संघांचे बाळासाहेब महाराज शेळके, किशोरमहाराज धुमाळ, शाखा प्रमुख रोहिदास कदम, सुयश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments