Type Here to Get Search Results !

प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर येथे जागतिक हिवताप दिन साजरा

हिवताप दिनाचे घोषवाक्य घेवुन विविध ठिकाणी जनजागृती रॅली


 आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :  येथील राजगुरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात चला हिवतापाला संपवुया, पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, सक्रिय व्हा असे या वर्षीचे हिवताप दिनाचे घोषवाक्य घेवुन विविध ठिकाणी जनजागृती रॅली, सभा घेत जागतिक हिवताप दिन आरोग्य सेवेत कार्यरत राहून तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.   


 हिवतापामध्ये थंडी वाजुन ताप येणे, घाम येणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या ही लक्षणे दिसुन येतात. ॲनोफिलिस डासाची मादी चावल्याने हा रोग होतो. या डासांची उत्पत्ती-स्वच्छ पाण्याची डबकी, तळे, कुंड्या, नाले, भात शेती यात होते. आरोग्य विभागाकडुन प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये - दूषित भांडी मोकळी करणे, गप्पी मासे सोडणे, नाले, गटारे वाहती करणे, मच्छर दाणीचा वापर यांसाठी जनजागृती उत्साहात करण्यात आली. घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे लावावीत. कूलर, फ्रिजच्या मागील पाणी साठे दर आठवड्याला साफ व कोरडे करणे. प्रा आ. केंद्र राजगुरुनगर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक रेवणनाथ ढाकणे, धनंजय घोसाळकर, भुषण भारती, दिपक शेलार, महेश दहिवाळ या आरोग्य सहायकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत यशस्वी नियोजन परिश्रम पूर्वक केले.

आरोग्यसेवक चंद्रशेखर जाधव, प्रतिक गवारी, दिपक भुसारी यांनी शाळा, अंगणवाडी येथे हिवतापा बद्दल जनजागृती केली. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे   आदींनी मोहिमेस विशेष मार्गदर्शन केले. 

Post a Comment

0 Comments