Type Here to Get Search Results !

परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गणेश परिधान करणे अनिवार्य


पुणे ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी  व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 



प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करुन आपली गैरसोय टाळावी. 

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही श्री. भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

0 Comments