महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन समारंभाचे गुरुवारी आयोजन
पुणे ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वा. पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर येथे होणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना, पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींचे संयुक्त संचलन होणार असून श्री. पवार या प्रसंगी मानवंदना स्वीकारणार आहेत. शासकीय ध्वजारोहण समारंभास केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळी ७.४५ वा. वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
.
वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी*
पुणे ( अर्जुन मेदनकर ) : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन येत्या लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १४८ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, ३० एप्रिल आणि शुक्रवार, २ मे २०२५ होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.
अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments