Type Here to Get Search Results !

Alandi अलंकापुरीत विविध कार्यक्रमांनी बुद्धपौर्णिमा साजरी

 अलंकापुरीत विविध कार्यक्रमांनी बुद्धपौर्णिमा साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सामुहिक बुद्धवंदना, खीरदान, बुद्धमुर्तीची मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांनी आळंदीत सोमवारी ( दि.१२ ) बुद्धपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  

  विविध उपक्रमांत आळंदी शहरातून बुद्धमुर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. या कार्यक्रमात बौद्ध उपासक व उपासिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय बौद्ध  महासभेच्या वतीने बुध्द पौर्णिमे निमित्त सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सामुहिक त्रिसरण व पंचशील घेण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष संदीप रंधवे यांनी आपले विचार मांडताना आज सर्व  विश्वाला भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शांतीच्या उपदेशा प्रमाणे आज जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे, असे ते म्हणाले. यानंतर स्मारका समोर खीरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अमोल कांबळे, राकेश रंधवे, अण्णासाहेब वाघमारे, राहूल डुमणे, प्रशीक मेश्राम, अजित थोरात, सुयोग कांबळे, अमोल अब्दुल्ले, समीर शिरसाट, धीरज कांबळे, विष्णू इंगोले, नितीन गायकवाड, जयश्री जगताप आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments