Type Here to Get Search Results !

alandi - khed आळंदी पंचक्रोशीतील शाळांचा १०० टक्के निकाल

पालक, शिक्षक, शालेय संस्था चालकांत समाधान ; शाळांच्या शैक्षणिक कार्याचे परिसरात कौतुक     

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड तालुक्यातील अनेक शाळांचे इयत्ता दहावीचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांचे गुणवत्तेत तसेच दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा कायम ठेवत अनेक शाळांचे पालक, शिक्षक, मुले- मुली आणि संस्था चालक यांचे नागरिक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करीत गावांचे, शाळेच्या नावलौकिकात वाढ केल्या बद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. 

ग्यानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के निकाल 

 येथील मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट संचलित ग्यानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आळंदी या प्रशालेच्या शाळेचा एसएससी बोर्ड निकाल शंभर टक्के निकालाचे परंपरा या वर्षीही कायम राहिली आहे. शाळेचा शंभर टक्के निकाल यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेच्या वतीने चेअरमन राजेंद्र घुंडरे पाटील, संचालिका कीर्ती घुंडरे पाटील, मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर,  व्यवस्थापक विजय धादवडकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्यासह संस्था चालकांनी शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.  गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे प्रथम सहात आदित्य वाघ, ऋतुजा पाटणकर, ओम पायगन,  अनिकेत कांबळे, अमृता वैष्णव, ओमकार जाधव यांचा समावेश आहे. सर्व मुलांचे मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर यांनी अभिनंदन केले आहे.

  येथील साने गुरुजी विद्यालय खरपुडी बुद्रुक मध्ये इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून पालक, शिक्षक, संस्था चालकांनी सर्व संबंधित यंत्रणा तसेच उत्तीर्ण विध्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयाचा निकाल मराठी व सेमी इंग्लिश या दोन्ही माध्यमांचा निकाल १०० टक्के लागला आहे.  

 गुणानुक्रमे पहिला हर्षवर्धन गाडे, द्वितीय क्रमांक प्रांजळ गायकवाड, तृतीय क्रमांक दर्शन भोगाडे, चवथा क्रमांक पियुष गाडे, पाचवा क्रमांक कार्तिक मोरे यांचा आला आहे. सर्व उत्तीर्ण विध्यार्थी आणि  मार्गदर्शक शिक्षकांचे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ खरपुडी व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. 

श्री भानोबा विद्यालय कोयाळीचा १०० टक्के निकाल 

 येथील कोयाळी मधील शाळेचा सन २०२४ - २५ चा दहावीचा बोर्ड निकाल १०० टक्के लागला आहे. यात ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम पाच क्रमांकात अनुक्रमे साक्षी खरात, निकिता निकम, समीक्षा दिघे, सायली भाडळे,  पूजा कोळेकर यांचा समावेश आहे.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 

कन्या विद्यालय चाकण १०० टक्के निकाल 

 चाकण येथील कन्या विद्यालयाचा देखील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या पाच क्रमांकात अनुक्रमे प्रथम राऊत समृध्दी, द्वितीय तनुजा मोरे, तृतीय संजीवनी कोकणे, 

चतुर्थ स्नेहा कदम, गौरी कुसाळकर, पाचवा पायल तेलभरे यांचा समावेश आहे. संस्थेचे वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले. 

  संस्कार ठाकरे यांस ९२ टक्के मार्क मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थी यांचे गुणवत्तेमुळे शाळा, संस्था आणि गावांचे नाव लौकिकात देखील वाढ झाल्याने संस्था चालक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ पदाधिकारी यांनीही उत्तीर्ण मुलं- मुलींचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पालकांनी पेढे भरवीत मुलांचे कौतुक करून समाधान, आनंद व्यक्त केला. 

कै.वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी 

श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी खेड या प्रशालेचा सलग ५ वर्ष १०० टक्के निकाल जाहीर झाल्याने परिसरातून पालक, शिक्षक, संस्था चालक यांनी आनंद व्यक्त करीत उत्तीर्ण मुलांना पुढील शैक्षणीक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. माध्यमिक शाळांत विद्यालय निकाल १०० टक्के यात विद्यालयाचे प्रथम पाच विध्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. अंकिता होले, सोहेल इनामदार, श्रावणी होले, आर्यन होले, रिया राळे, श्रावणी हजारे या मुलांचा समावेश आहे. गुणवंत मुलांचे श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मांजरे यांचेसह सर्व संचालक, सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत मांजरेवाडी, होलेवाडी, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांच्या वतीने सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.   

पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण  

 श्री शिवाजी विद्यामंदिर व  सितामाई  भिकोबा शेठ पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण येथील दहावीचा निकाल ९४. ५२ टक्के लागला. प्रथम सायली सोळंके, द्वितीय कार्तिकी जाधव, तृतीय अरिहंत आडते यागुणवंत विद्यार्थ्याचे प्रशाले तर्फे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले.

सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल 

  बहुळ येथील सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी परीक्षेचा निकाल देखील १००  टक्के लागला आहे. यात सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम या दोन्ही माध्यमांचा समावेश आहे. पहिल्या पाच क्रमांकांत अनुक्रमे पायल गाडे, सृष्टी साबळे, तनुष्का साबळे, जिज्ञासा आरेकर, दुर्वांकुर आरेकर या  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाने संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा, उपाध्यक्ष जितेंद्र बोरा, प्राचार्य एस. बी. टाव्हरे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ बहुळ, साबळे वाडी, सिद्धेगव्हाण गावाचे वतीने हार्दिक अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments