Type Here to Get Search Results !

Alandi ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमातील विद्यार्थी ठरले गुणवंत

 ज्ञानेश्वर विद्यालयाचे एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश ; दिव्यांग विभागाने आपला १०० टक्के निकाल

 ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमातील विद्यार्थी ठरले गुणवंत 

 

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या एस. एस. सी. ( दहावी ) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. यात श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा ४१४ पैकी ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा ९९ .५२  टक्के निकाल लागून घवघवीत यश प्रशालेस मिळाले. या वर्षीही दिव्यांग विभागाने आपला १०० टक्के निकाल लावून यशाची परंपरा कायम ठेवली.

इयत्ता १० वी तील प्रथम तीन विद्यार्थी यात भक्ती राऊत या विद्यार्थिनीने ९७.०० टक्के गुण मिळवून प्रथम,  सुजित जोरी, प्रणव शिंदे या विद्यार्थ्यानी ९६.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर सायली पराये या विद्यार्थिनींने ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. त्याच बरोबर आदित्य कंकाळे ९५.०० टक्के,  गायत्री जाधव ९४.८० टक्के, वैष्णवी पाखरे ९४.२० टक्के,  प्रणम्य पालकर ९३.६० टक्के, सलोनी घुले ९३.४० टक्के,  सिरसकर ९२.२० टक्के, अरुंधती पांचाळ ९१.४० टक्के, अनिकेत आयाचित ९०.६० टक्के, गौरी बोर्डे ९०.२० टक्के गुण मिळवून यश मिळवले. अभिमानाची बाब अशी की प्रथम आलेले तीन आणि ९० टक्के हुन अधिक गुण मिळविलेले हे सर्व विद्यार्थी 'ओळख श्री ज्ञानेश्वरीची' या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी आहेत. तसेच दिव्यांग विभागामध्ये प्रथम तीन विद्यार्थीनी यामध्ये पूर्वा नाईक या विद्यार्थिनीने ७९.०४ टक्के गुण मिळवून प्रथम, गायत्री ढेपे या विद्यार्थिनीने ७६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर हर्षदा लोखंडे या विद्यार्थिनीने ७५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. 

   या सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचे, समन्वयिका सायुज्यता तायडे, दहावीचे सर्व वर्गशिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक  यांनी अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments