प्राचार्य विजय गुळवे, वैष्णवी गुळवे यांचे कौतुक ; गुणवंत विद्यार्थी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा एस.एस.सी. बोर्ड परिक्षा २०२४ --२५ चा निकाल १०० टक्के निकाल लागल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी दिली.
एसएससी बोर्ड परीक्षा निकालामध्ये आळंदी मधील ज्ञानगंगा इंग्लीश मिडीयम स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत दर्जेदार शिक्षणास प्राधान्य देण्याचे कार्याचे परिसरातून पालक, नागरिक यांनी कौतुक करीत प्रशालेच्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रशालेतील गुणवंत ( Toppers ) मुलांमध्ये गुणानुक्रमे हर्षदा पवार, कौशिकी कडू, शुभम यादव, पूजा चौधरी, श्रुती म्हस्के यांचा समावेश आहे. या परीक्षेत ५० टक्के विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता Distinction प्राप्त केले. यात १० टक्के विध्यार्थी हे ८५ टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, प्रा. विजय गुळवे, प्राचार्या वैष्णवी गुळवे, सर्व संस्था चालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनी या कोणत्याही खाजगी ट्युशनला न जाता त्यांनी हे यश संपादन केले. सर्व शिक्षक वर्षा भालेराव, संदीप आवटे, वनिता बैरागी, रुपाली घोगरे, प्रियांका रेवटकर, जगदीश चौधरी, राखी झा, जितेंद्र भगत यांनी देखील विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेतली. या प्रसंगी सर्व पालक वर्गाने देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाच्या यशाबद्दल प्रा. विजय गुळवे, प्राचार्या वैष्णवी गुळवे यांचे अभिनंदन केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

Post a Comment
0 Comments