गुणवंत विध्यार्थी यांचे प्रशाले तर्फे अभिनंदन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील प्रा. डॉ. न. का. घारपुरे प्रशालेचा SSC परीक्षा फेब्रुवारी २०२४ – २५ निकाल ९२.४० टक्के लागला असून माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आली होती. परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश प्राप्त झाले असून गुणवंत विध्यार्थी यांचे प्रशाले तर्फे अभिनंदन करण्यात आले.
गुणवंत मौलांमध्ये गुणानुक्रमे पहिल्या पाच मुलांत वैभव शेवाळे, दिपाली वंजे, शुभम थोरात, जनार्दन खरात, आदिनाथ काचोळे या पाच गुणवंतांचा समावेश आहे. गुणवंत, यशस्वी तथा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशाले तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले असून अशीच प्रगती यापुढे आणखी वाढत राहील असा विश्वास प्रा. भगवान वाणी यांनी व्यक्त केला आहे.
.jpeg)


Post a Comment
0 Comments