गुणवंतांचे मार्गदर्शक प्राचार्य, मुख्याध्यापक यांचा सन्मान उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील च-होली बु।।गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री वाघेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा ९८.२५ टक्के लागला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यावर्षी कौतुकास्पद लागला असल्याने स्थानिक नागरिक पदाधिकारी यांनी प्रशालेचे अभिनंदन करीत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन.करण्यात आले. याशिवाय या गुणवंत विद्यार्थ्यांना मोलाच मार्गदर्शन आणि घडवण्याचे सेवा कार्य केलेल्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत विध्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुलांसह शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी, सेवक वर्ग, प्राचार्य, शिक्षक याचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. शाळेच्या पुढील वाटचालीस पंडित तापकीर पाटील यांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे आयोजन च-होली, पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोळक यांच्या नेतृत्वात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. नेवासकर, प्रभारी मुख्याध्यापक संपतराव धावडे यांचेसह शिक्षकवृंद यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात करण्यात आला. या प्रसंगी पंडित तापकीर पाटील, रघुनाथ भोसले, भाऊसाहेब भोसले, सुनील भोसले, प्रशांत तापकीर पाटील, प्रकाश तापकीर, सुरेश तापकीर, रामदास काळजे आदी उपस्थित होते. चऱ्होली प्रशाला ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचा घटक असून या शाळेतील उत्तीर्ण मुलांचे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार तर्फे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बाळासाहेब मोळक, भाऊसाहेब भोसले यांनी केले. प्रशांत तापकीर यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments