Type Here to Get Search Results !

Dehu देहू नगरपंचायतीसाठी कायम स्वरूपी मुख्याधिकारी नियुक्तीस ग्रामस्थांचे साकडे

सद्या तीन ठिकाणचा पदभार मुख्याधिकारी सेवारत  



देहू - आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पद सद्या रिक्त असल्याने नागरिकांना विविध समस्यांना गैरसोयीचे सामोरे जावे लागत आहे. गेली ४५ वर दिवसापासून देहू नगरपंचायतीस कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही. यामुळे तीर्थक्षेत्रातील विविध विकास कामे रखडली आहेत. सद्या तीन ठिकाणचा पदभार मुख्याधिकारी सांभाळत असून ते सेवारत आहेत.   

  यात कामगारांचे वेतन, खाजगी कामांचे बाह्य यंत्रणा सेवा विषयक तसेच इतर विविध विकासाची कामे यांची बिले, नागरिकांचे अर्जावरील कामे प्रलंबित राहिली आहेत. येत्या काळात  श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जवळ आला आहे. या पालखी सोहळ्याचे अनुषंगाने अनेक कामे प्रस्तावित असून भाविक, वारकरी, नागरिक यांना प्रस्थान काळात विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी देहू नगरपंचायत कार्यालयास कायम स्वरूपी मुख्याधिकारी तात्काळ नियुक्त करावा अशी मागणी ग्रामस्थांचे वतीने केली जात आहे.

 देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांना बढती मिळून त्यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त पदी झाल्यापासून येथील पद रिक्त आहे. सद्या डॉ. प्रवीण निकम यांची देहू नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांचे कडे इतर दिन नगरपरिषदांचा पदभार असल्याने तीन तीन ठिकाणचे कामकाज पाहावे लागत आहे. यामुळे देहू नगर पंचायत येथे कामकाजावर परिणाम होत आहे. सर्व नगरपरिषदांमध्ये वेळ देताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. याचा कामकाजावर परिणाम होत असल्याने नागरिकांतुन नाराजी आहे. येथील विकास कामांना न्याय देण्यासाठी देहू नगरपंचायतसाठी कायम स्वरूपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती नगरविकास विभागाने करावी अशी मागणी देहूगावकर नागरिक, ग्रामस्थांचे मधून जोर धरत आहे. श्री संत तुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे देहू येथून १८ जून ला हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याचे अनुषंगाने नगरविकास विभागाने तात्काळ दखल घेऊन मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments