Type Here to Get Search Results !

Alandi रोहिदास कदम यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड जाहीर

आळंदी / प्रतिनिधी : महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले मराठी - हिंदी दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ साठी पुणे आळंदी येथील रोहिदास कदम यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रोहिदास कदम यांना हा अवार्ड सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 

  सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी *इंडियन एक्सलन्स अवार्ड* चे आयोजन करण्यात येते आहे. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या सेवाभावी व्यक्ती, सामाजिक संस्था यांचेसह  पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये पुणे आळंदी येथील रोहिदास कदम यांची निवड पंचलिंग श्रीगुरुदेवदत्त प्रतिष्ठान अंतर्गत धार्मिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याचे सन्मान इंडियन एक्सलन्स अवार्ड देऊन करण्यात येत आहे. १ जून २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉल मध्ये या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या सामान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते रोहिदास कदम यांना हा पुरस्कार प्रदान होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.  

Post a Comment

0 Comments