अर्जुन मेदनकर विशेष सेवेच्या कार्याचा सन्मान
आळंदी / प्रतिनिधी : महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले मराठी - हिंदी दैनिक अहिल्याराज च्या वर्धापन दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ साठी पुणे आळंदी येथील अर्जुन मेदनकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रासह आळंदी परिसरात वृक्ष संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन सेवा कार्याचे माध्यमातून विशेष उल्लेखनीय कार्यासाठी अर्जुन मेदनकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला, क्रीडा, धार्मिक क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची परिसरात पर्यावरण संवर्धनाचे केलेल्या विशेष सेवेच्या कार्याचा सन्मान म्हंणून अर्जुन मेदनकर यांची निवड पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी निवड जाहीर करण्यात आली आहे. १ जून २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. या समारंभात अर्जुन मेदनकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments