Type Here to Get Search Results !

Alandi न्यायाधीश महेंद्र महाजन यांची आळंदी सोहळ्यास भेट उपक्रमाची पाहणी

कामगार राज्य मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा सत्कार 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) ; श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आणि कामगार राज्यमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती आळंदी सप्ताह सोहळ्यास लाभली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी आळंदी येथे सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देत उपक्रम आणि सोहळ्याची माहिती जाणून घेतली. 

  आळंदीच्या विश्वस्त मंडळात दोन गावकऱ्यांचा समावेश करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण केली. तसेच, संस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वस्ताची नेमणूक करून त्यांनी सामाजिक समावेशकतेचा दृष्टिकोन दाखवला. महेंद्र महाजन यांनी सर्वांच्या सहकार्याने आळंदी देवस्थानच्या विकासाची भक्कम पायाभरणी करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, 'सर्वांशी समन्वय साधून देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील' आणि देवस्थानच्या ज्ञानभूमी प्रकल्पाला हे विश्वस्त मंडळ आकारात आणून भाविक आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील. 

या दिव्य आणि भव्य उत्सवासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ आणि वारकरी यांच्या तील सहकार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, याच एकजुटीमुळे हा महोत्सव यशस्वी होत आहे. या प्रसंगी महाजन साहेबांनी उत्सवाच्या व्यवस्थेची पाहणी केली आणि अन्नप्रसाद कक्षेला भेट देऊन विश्वस्तां समवेत अन्नप्रसाद घेतला. आळंदीच्या विकास आराखड्यासाठी प्रयत्नशील असलेले ॲड आकाश फुंडकर  म्हणाले, 'आळंदीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.' जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आळंदीच्या देवस्थानच्या विकास कामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उपस्थितीने देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साह होता. 

Post a Comment

0 Comments